तरुण भारत

भाताच्या आधारभूत दरात वाढ

इतरही पिकांचे किमान भाव वाढविले, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

यंदाच्या खरीप हंगामाकरिता केंद्र सरकारने भाताच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) 72 रुपये प्रतिक्विंटलने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा दर 1 हजार 940 रुपये प्रतिविंमवटल झाला आहे. आता भाताच्या पेरणीला प्रारंभ झाला असून शेतकरी त्या कामात गुंतले असतानाच त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाताप्रमाणेच केंद्र सरकारने तीळ, तुरी, बाजरी इत्यादी धान्ये व तेलबियांच्या किमान आधारभूत दरातही वाढ केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती पत्रकारांना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. किमान आधारभूत किंमत व्यवस्था काढून टाकली जाणार, या विरोधकांच्या अपप्रचाराला केंद्र सरकारने कृतीने उत्तर दिले आहे. ही व्यवस्था आहे आणि पुढेही राहील. प्रत्येक वर्षी केंद्र सरकार किमान आधारभूत दरांमध्ये वाढच करीत आहे. यापुढेही परिस्थिती पाहून अशी वाढ करण्यात येईल, असे आश्वासन तोमर यांनी दिले.

इतर पिकांनाही दरवाढ

तिळाच्या दरात सर्वाधिक म्हणजे 452 रुपये प्रतिक्विंटलची वाढ करण्यात आली. तुरीच्या आणि उडदाच्या दरात प्रत्येकी 300 रुपये तर बाजरीच्या दरात 100 रुपये वाढ झाली. शेतकऱयांना समाधान वाटेल अशी ही दरवाढ आहे, असे प्रतिपादन तोमर यांनी केले.

गव्हाची सर्वाधिक खरेदी

किमान आधारभूत किमतीवर केंद्र सरकारने यंदा 4 कोटी 16 लाख टन गव्हाची  खरेदी केलेली आहे. ती आतापर्यंतची सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी तिचे प्रमाण 3 कोटी 71 लाख 33 हजार मेट्रिक टन इतके होते. यंदा त्यात 12.14 टक्के वाढ करण्यात आली आहे. गहू खरेदी करण्यात आलेल्या पहिल्या पाच राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानचा समावेश आहे. पंजाबमधून सर्वाधिक 1 .32  कोटी टन, तर हरियाणातून 84.93 लाख टन गव्हाची खरेदी झाली. मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातून यंदा अनुक्रमे 1.288  कोटी टन आणि 45.78 लाख टन गव्हाची खरेदी झाली आहे.

बॉक्स

रेल्वेलाही स्पेक्ट्रम मिळणार

भारतीय  रेल्वेसाठी 5 मॅगाहर्टझ् इतक्या प्रमाणात 4-जी स्पेक्ट्रम देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. रेल्वेची दूरसंचार व सिग्नल प्रणाली सुधारित बनविण्यासाठी हा स्पेक्ट्रम देण्यात आला. या योजनेवर पुढील पाच वर्षांमध्ये 25 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. रामगुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णयही याच बैठकीत घेण्यात आला. 2012 च्या हिशेबांनुसार ही गुंतवणूक वाढविली जाणार आहे.

बॉक्स

विविध पिकांना दरवाढ…

पीक               2020    2021    दरवाढ

भात (सामान्य) 1,868   1,940   72

भात (अ ग्रेड)    1,888   1,960   72

ज्वारी (हायब्रीड)          2,620   2,738   50

ज्वारी (मालदांडी)         2,640   2,758   118

बाजरी                        2,150   2,250   100

नाचणी                        3,295   3,377   82

मका               1,850   1,870   20

तूर                 6,000   6,300   300

उडीद              6,000   6,300   300

मूग                 7,196   7,275   79       

भुईमूग                        5,275   5,550   275

सूर्यफूल बीज    5,885   6,015   130     

सोयाबीन (पिवळे)        3,880   3,950   70

तीळ               6,855   7,307   452

नायजेरसीड     6,695   6,930   235

कापूस                         5,515   5,726   211

कापूस (लांबधागा)        5,825   6,025   200

Related Stories

आग्र्यात भीषण अपघात; फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना कंटेनरने उडवले; 5 जण ठार

pradnya p

केरळच्या कोची शहरातील अवैध इमारती जमीनदोस्त

Patil_p

कोरोनाग्रस्तांसाठी ओडिशाकडून देशातील सर्वात मोठे रुग्णालय

tarunbharat

दिल्लीत चोवीस तासांत 384 कोरोना रुग्ण

pradnya p

निर्भया बलात्कार प्रकरण : गुन्हेगारांना 22 जानेवारीला फाशी

prashant_c

कोरोनामुळे यंदाही हज यात्रेचे सर्व अर्ज रद्द

triratna
error: Content is protected !!