तरुण भारत

जितीन प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँगेसला धक्का 

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

उत्तर प्रदेशमधील महत्वाचे युवा काँगेस नेते जितीन प्रसाद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा या राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँगेसला धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. या राज्यात पुढच्या वर्षी मार्चमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बालुनी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला सुयोग्य नेतृत्व देत आहेत. तसेच भाजप हाच खऱया अर्थाने राष्ट्रीय पक्ष असून संस्थात्मक पद्धतीने कार्य करणारा तो एकमेव पक्ष आहे. इतर पक्ष आता केवळ काही स्थानिक नेत्यांच्या भरवशावरचे पक्ष उरले आहेत. भारताचे भवितव्य या पक्षाच्या हाती सुरक्षित असल्याने आपण त्यात प्रवेश करीत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना केले.

गोयल यांच्याकडून प्रशंसा

जितीन प्रसाद हे उत्साही आणि कार्यमग्न व्यक्तीमत्व आहे. त्यांची स्वतःची एक प्रतिमा असून पक्षाला त्यांचा लाभ होईल. भाजपच्या समाजकार्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहील, अशी त्यांची भलावण गोयल यांनी केली. 47 वर्षांचे प्रसाद हे काँगेसचे युवानेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे पश्चिम बंगालचे उत्तरदायित्व देण्यात आले होते. तथापि, नंतर त्यांचे काँगेस श्रेष्ठींशी मतभेद झाले. परिणामी, त्यांनी पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला.

नेतृत्वाशी मतभेद

जुन्या पिढीतील लोकप्रिय काँगेस नेते जितेंद्र प्रसाद यांचे ते पुत्र आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच ते भाजपमध्ये येतील अशी अटकळ होती. तथापि, त्यावेळी काँगेसच्या नेतृत्वाने त्यांना पक्षात राखण्यात यश मिळविले होते. तथापि, नंतर त्यांचे पक्षनेतृत्वाशी मतभेद वाढत गेल्याने त्यांची कोंडी होऊ लागली होती, असा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केला. अखेर त्यांनी भाजपप्रवेश केला आहे.

Related Stories

राजस्थानात वाढतोय बर्ड-फ्ल्यूचा धोका

Patil_p

पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 2,137 नवे कोरोना रुग्ण

pradnya p

ममता बॅनर्जींनी घेतली तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

datta jadhav

जून तिमाहीत 554कंपन्यांची लाभांश देण्याची घोषणा

Patil_p

दिल्ली दंगलप्रकरणी 15 जणांवर आरोपपत्र दाखल

datta jadhav

चीनने आक्रमकपणा दाखविल्यास जशास तसे उत्तर द्या…

datta jadhav
error: Content is protected !!