तरुण भारत

सलग दुसऱया दिवशी लाखाहून कमी रुग्ण

देशात दिवसभरात 92 हजार 596 नवे बाधित ः 1.62 लाख जणांना डिस्चार्ज

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारतात सलग दुसऱया दिवशी एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी देशभरात 92 हजार 596 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी सोमवारी 86 हजार 498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. सोमवारच्या तुलनेत नव्या बाधितांची संख्या 6 हजारनी वाढली आहे.

देशात कोरोना रुग्णसंख्या घटत असताना 24 तासात पुन्हा रुग्णवाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मंगळवारी 92,596 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2,219 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱया रुग्णांची संख्याही वाढली असून मंगळवारी 1 लाख 62 हजार 664 जणांनी कोरोनावर मात केली. सध्या भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 90 लाख 89 हजार 069 पोहोचली आहे. आतापर्यंत 3 लाख 53 हजार 528 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा मृत्यूदर 1.21 टक्के एवढा झाला आहे. तसेच 2 कोटी 75 लाख 4 हजार 126 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला 12 लाख 31 हजार 415 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

37 कोटींहून अधिक चाचण्या

देशात आजवर 37 कोटी 01 लाख 93 हजार 563 चाचण्या पूर्ण झाल्या असून गेल्या 24 तासात 19 लाख 85 हजार 967 नमुने तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरने प्रसिद्ध केली आहे. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 23 कोटी 90 लाख 58 हजार 360 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 19 कोटी 19 लाख 36 हजार 212 जणांना लसीचा पहिला डोस तर, 4 कोटी 69 लाख 04 हजार 423 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

Related Stories

कोरोनासंसर्ग वाढल्याने सौदीत ‘विमानबंदी’

Patil_p

महिलेच्या दाव्याने अनुराधा पौडवाल भडकल्या

Patil_p

मध्यप्रदेशात विषारी दारूचे 20 बळी

Patil_p

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या दिल्लीतील पत्रकारास अटक

pradnya p

शाळांचे तास, अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार सुरू : डॉ. रमेश पोखरियाल यांची माहिती

pradnya p

युपी : पूर नियंत्रण आणि महसूल राज्य मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनामुळे निधन

pradnya p
error: Content is protected !!