तरुण भारत

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

कुटुंबात कुणी कोरोनाबाधित आढळल्यास मिळणार 15 दिवसांची रजा

@ वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

Advertisements

केंद्र सरकारने स्वतःच्या सर्व कर्मचारीवर्गाला कोरोनाबाधित कुटुंबियाची देखभाल करण्यासाठी 15 दिवसांची स्पेशल कॅज्युअल लीव्ह (एससीएल) देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या कुठल्याही कर्मचाऱयाचे पालक किंवा अन्य कुटुंबीय कोरोनाबाधित झाल्यास त्याच्या देखभालीसाठी 15 दिवसांची विशेष कॅज्युअल लीव्ह दिली जाऊ शकते. कार्मिक मंत्रालयाच्या एका आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.

कर्मचाऱयाच्या कुटुंबियाला कोरोना संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास 15 दिवसांच्या स्पेशल कॅज्युअल लीव्हनंतरही अन्य कुठल्याही प्रकारची शिल्लक रजा मिळू शकते. रुग्णालयातून कुटुंबीय डिस्चार्ज होईपर्यंत अशाप्रकारे रजा घेऊ शकतो असे कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले गेले आहे.

कोरोनाकाळात केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाकडे कोरोनासंबंधी देखभाल आणि क्वारंटाईन कालावधीशी संबंधित रजेबाबत अनेकांनी विचारणा केली होती. याचमुळे मंत्रालयाने यासंबंधी एक विस्तृत आदेश काढला आहे.

केंद्रीय कर्मचारी स्वतः कोरोनाबाधित आढळल्यास त्याला 20 दिवसांची थेट रजा मिळू शकते. कोरोनाबाधित झाल्यावर होम आयसोलेशन किंवा क्वारंटाइनमध्ये राहिल्यासही ही रजा घेता येणार आहे. जर कर्मचारी होम आयसोलेशननंतर रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला संक्रमणानंतर देखील 20 दिवसांपर्यंत कम्युटेड लीव्ह/एससीएल/अर्न्ड लीव्ह इत्यादी मिळू शकते.

कोरोनाबाधित कर्मचारी रुग्णालयात दाखल झाल्यास आणि त्याला 20 दिवसांहून अधिक काळ भरती रहावे लागल्यास कम्युटेड लीव्ह दिली जाऊ शकते. कुटुंबीय किंवा पालक कोरोनाबाधित असल्यास कर्मचाऱयाला स्पेशल कॅज्युअल लीव्हच्या स्वरुपात 15 दिवसांची रजा मिळू शकते. कर्मचारी जर कोरोनाबाधिताच्या थेट संपर्कात आल्यास आणि यामुळे होम आयसोलेशन करावे लागल्यास प्रारंभीच्या 7 दिवसांपर्यंत ऑन डय़ुटी मानले जाणार असल्याचे या आदेशात म्हटले गेले आहे.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 1492 वर

tarunbharat

एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव

Patil_p

युपी : सोमवारपर्यंत वाढवले लॉकडाऊन!

pradnya p

शेतकरी आंदोलनावर आज पुन्हा खलबते

Omkar B

तेलंगणात एनपीआरची रंगीत तालीम

Patil_p

दिल्लीतील सेना भवन सील, एका जवानाला कोरोनाची बाधा

pradnya p
error: Content is protected !!