तरुण भारत

भाटय़ेत येथे ऍसिड टँकर दरीत कोसळला, परिसरात घबराट

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरानजीकच्या भाटय़े येथे ऍसिड घेऊन जाणारा टँकर खोल दरीत कोसळला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. टँकरमधून ऍसिड बाहेर वाहून गेल्याची भीती व्यक्त होत असून आजूबाजूच्या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

Advertisements

  रत्नागिरी तालुक्यातील रनपार-गोळप येथे फिनोलेक्स ही प्रसिध्द कंपनी पाईप व  रेझिनचे उत्पादन करत आहे. या कंपनीत विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरले जातात. त्यामुळे येथून अशा पदार्थांची ने-आण सातत्याने केली जाते. या कंपनीमधून ऍसिड घेऊन निघालेला टँकर भाटय़े येथील तीव्र वळणावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले. टँकर रस्ता सोडून दरीत कोसळला. यावेळी टँकरमधील गॅसची गळती झाली. याचवेळी मुसळधार पाऊस असल्यामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. उग्र दुर्गंधीमुळे कोणीही जवळ जाण्यास धजावत नव्हते. ऍसिडमुळे ट्रक पेट घेईल असे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी टँकर चालकाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची खबर मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. झाडीत टँकर कोसळल्यामुळे काढणे अवघड झाले होते. मुसळधार पाऊस आणि काळोख यामुळे अधिक अडचणी निर्माण होत होत्या.

Related Stories

अंगावरून चाक गेल्याने तरूण ठार

Patil_p

बांद्यात तपासणी नाक्यावर 40 हजाराची दारू जप्त

NIKHIL_N

भाजप आक्रमक, वाटप थांबवण्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प

Patil_p

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणीच महाराष्ट्र दिन

NIKHIL_N

लांजात छुप्या पद्धतीने गावठी दारुधंद्याना ऊत

Patil_p

अपघातग्रस्त डबे हटवण्याचे काम युध्दपातळीवर

Patil_p
error: Content is protected !!