तरुण भारत

तिसरा ‘टीका उत्सव’ लवकरच

18 ते 44 वयोगटातील सर्वांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 ते 44 वर्षे वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्यासंबंधी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने ’टीका उत्सव 3.0’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचीही त्यावेळी उपस्थिती होती. मंत्रीमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात पेडणे येथील कदंब बसस्थानक वाहतूक खात्याकडे सुपूर्द करणार,  आदिवासी, ओबीसी यांच्यासाठी 2013 पासून शिष्यवृत्ती खर्चाला मंजुरी, गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये 40 टन एसी टॉवर उभारण्यासाठी केलेल्या खर्चाला मंजुरी, यासारख्या विषयांचा समावेश होता.

टीका उत्सवावर नाहक टीका

’टीका उत्सव 3.0’ द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे सरकारचे प्रयत्न असतील. तसेच 18 ते 44 वयोगटातील प्रत्येकाचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या टीका उत्सवास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यापूर्वी राज्यातील ग्रामपंचायती आणि पालिकांच्या सहयोगातून दोन टीका उत्सव आयोजित करण्यात आले व ते यशस्वी ठरले. विरोधकांनी मात्र विनाकारण टीका करून टीका उत्सवास गालबोट लावण्याचे प्रयत्न केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

19 जुलै पर्यंत पूर्ण दर्जाचा अर्थसंकल्प

दरम्यान, 2021-22 साठी गोवा विधानसभेत 19 जुलैपर्यंत पूर्ण दर्जाचा अर्थसंकल्प मंजूर होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. फेब्रुवारीत अल्पकाळाचे अधिवेशन घेऊन लेखानुदान मंजूर करण्यात आले होते. पुढील महिन्यात होणाऱया अधिवेशनात पूर्ण अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर वित्तसंबंधी सर्व अडचणी दूर होतील, असेही ते म्हणाले. मंत्रीमंडळाने साबांखाच्या कामगार पुरवठा सोसायटीतील 270 रोजंदारीवर कामगारांच्या नोंदणीस मान्यता दिली. या कर्मचाऱयांना यापुढे रजा, वैद्यकीय खर्च यासारख्या सुविधांचा लाभ मिळणार आहे.

निवृत्त न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांची नियुक्ती गोवा पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निवृत्त न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे पद रिक्त होते. न्या. सरदेसाई यांच्या नियुक्तीमुळे आता या प्राधिकरणाचे काम मार्गी लागणार आहे.

Related Stories

सुदिन ढवळीकर व पत्नी कोरोनाबाधित

Omkar B

अटक केलीच तर 25 हजारांच्या बॉण्डवर सोडा

Patil_p

दुर्गा – वेळ्ळी येथे 45 वर्षांनंतर बहरली शेती

Omkar B

हरमल येथे 34.95 लाखाचा चरस जप्त

Patil_p

भाडेपट्टी थकल्याने कुडचडे पालिकेकडून 9 दुकानांना सील

Patil_p

1473 प्रवाशांना घेऊन श्रमिक ट्रेन हिमाचल प्रदेशकडे रवाना

Omkar B
error: Content is protected !!