तरुण भारत

कोरोना : 456 बाधित, 16 बळी

दिवसभरात 549 कोरोनामुक्त

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

कोरोनामुळे गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी 16 जणांचा अंत झाला असून 456 नवे बाधित सापडले आहेत तर 549 जण बरे होऊन कोरोनातून मुक्त झाले आहेत. कोरोना बळींचे सत्र चालूच असून आता एकूण बळींची संख्या 2877 वर पोहोचली आहे. दिवसभरात 66 जणांना हॉस्पिटलात भरती करण्यात आले असून 57 जणांना तेथून घरी पाठवण्यात आले. सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 5790 एवढी असून 390 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून राज्यात एकूण 160740 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 152073 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.

विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली-98, सांखळी-200, पेडणे-238, वाळपई-153, म्हापसा-136, पणजी-303, हळदोणा-62, बेतकी-159, कांदोळी-179, कासारवर्णे-43, कोलवाळ-119, खोर्ली-152, चिंबल-246, शिवोली-124, पर्वरी-240, मये-61, कुडचडे-177, काणकोण-134, मडगांव-463, वास्को-195, बाळ्ळी-145, कासावली-191, कुठ्ठाळी-288, चिंचिणी-107, कुडतरी-161, लोटली-183, मडकई-108, केपे-169, सांगे-185, शिरोडा-166, धारबांदोडा-107, फोंडा-445, नावेली-112.

विविध आरोग्य केंद्रातील रूग्णसंख्या हळूहळू कमी होत असून कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे चित्र आहे. नवे बाधित, बळी कमी झाले असून त्यांची संख्या 0 होण्याची प्रतीक्षा करण्यात येत आहे. मडगावच्या मदर केअर हॉस्पिटलातील 2 मृत्यूची नोंद आता करण्यात आली आहे.

कोविडच्या सर्व बळींची सरकारदरबारी नोंद

कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू आलेल्या 100 टक्के बळींची नोंद आरोग्य बुलेटिनमध्ये करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. पर्वरीत पत्रकारांनी विचारलेल्या संबंधित प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात विविध खाजगी रुग्णालयात झालेल्या कोविड बळींची माहिती तब्बल नऊ महिन्यांपर्यंत उघड न करणाऱया रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दोन दिवसांपूवर्ग्नीच त्यासंदर्भात माहिती उघड झाली होती. त्यानुसार दोन टप्प्यांत एकुण 72 बळींची माहिती उघड झाली होती. या प्रकारामुळे राज्यात खळबळ माजली होती. विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारले असता सदर खाजगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर 100 टक्के कोविड बळींची नोंद करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला.

गृहविलगीकरणात मृत्यू झालेल्या किंवा इस्पितळात मृत आणलेल्या रुग्णांचीसुद्धा कोविड 19 चाचणी करण्यात आली. अशाप्रकारे कोविड रुग्णांची तपासणी आणि आरोग्य बुलेटिनमध्ये नोंदणी करणारे गोवा हे एकमेव राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, या विषयावरून आम आदमी पार्टी आणि प्रदेश काँग्रेस समितीनेही सरकारवर जोरदार टीका करताना मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली होती. त्याचबरोबर मृत रुग्णांची माहिती सरकारला सादर न केलेल्या खाजगी रुग्णालयांना आरोग्य कायद्याखाली कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Stories

राज्यात जानेवारीपासून रोजगार भरती

Patil_p

प्रफुल्ल पटेल यांच्या विधानातून सत्य परिस्थिती स्पष्ट : सरदेसाई

Omkar B

स्वातंत्र्यसैनिक फ. य. प्रभुगावकर यांचे निधन

Amit Kulkarni

रेलगाडीच्या धडकेने वास्कोत मजूर जागीच ठार

Amit Kulkarni

मंत्री पावसकरांकडे खंडणी मागणारे गजाआड

Patil_p

स्पोर्ट्स सेंटरचे जयेश साळगांवकर यांच्याहस्ते उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!