तरुण भारत

मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

  • मुंबईकरांनों, आज विनाकारण बाहेर पडू नका! 


ऑनलाईन टीम / मुंबई : 


मुंबईत कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात जून महिन्याच्या सरासरी पावसाच्या 44 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरांमध्ये काल 12 तासांत सर्वाधिक 214.44 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

Advertisements


हवामान विभागाकडून मुंबईला आज ऑरेंज अलर्ट दिला असून 12 ते 13 जूनला म्हणजेच उद्या आणि परवा  रेड अलर्ट देण्यात आला असला तरी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यासोबतच काम नसेल तर कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आले आहे. 

  • मुंबईतील लोकल सेवा आज सुरळीत सुरू 


दरम्यान, पहिलाच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. पावसाने सुरुवातच अतिरौद्ररुप धारण करून केल्याने मुंबईसह उपनगरांत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. पावसाच्या कोसळधारांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले, तसेच अनेक ठिकाणी वाहतूक, लोकल सेवा देखील विस्कळीत झाली होती. तसेच आता पुढील आणखी चार दिवस धुवांधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मात्र, आज सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली असून आज लोकल सेवा सुरळीतपणे सुरु झाली आहे. त्यामुळे आज लसीकरण केंद्रावर लसीकरण देखील सुरू रहाणार आहे. 


दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतील पाऊस आणि वाहतूक कोंडचा आढावा घेतला. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करण्यासंदर्भात आणि वाहतूक सुरळीत होईल याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Related Stories

ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन

triratna

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई रुग्णालयात दाखल

Rohan_P

पात्र मागासवर्गीय शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती द्या

triratna

शाहुवाडी : खुटाळवाडीतील ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील ३५ जणांना केले क्वारंटाईन

triratna

हिमाचल : 800 मीटर दरीत कोसळली बोलेरो; 4 जणांचा मृत्यू

Rohan_P

“राज्यपालांनी राजकारणातील प्यादं होऊ नये”; संजय राऊतांकडून आपुलकीचा सल्ला

triratna
error: Content is protected !!