तरुण भारत

`अॅटो फायर बॉल’ करणार रेकॉर्ड रुमची सुरक्षा

आगीपासून संरक्षण करणारी यंत्रणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे दाखल

प्रवीण देसाई/कोल्हापूर

Advertisements

अनेक वर्षांपासूनचे दस्तऐवज, जुनी महत्वाची शासकिय कागदपत्रे जपून ठेवली जाणारी जागा म्हणजे रेकॉर्ड रुम. या रुमची आगीपासून सुरक्षा करण्यासाठी आता नवीन अत्याधुनिक यंत्रणा आली आहे. `अॅटो फायर बॉल’ असे त्याचे नाव असून आग लागल्यास काही सेकंदात हा बॉल फुटून ही आग आटोक्यात येऊ शकते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे असे दीडशे फायर बॉल दाखल झाले आहेत. लवकरच ते जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व प्रांताधिकारी कार्यालये व तहसिलदार कार्यालयांमध्ये बसविले जाणार आहेत.

रेकॉर्ड रूममध्ये सर्व प्रकारची कागदपत्रे जपून ठेवलेली असतात. काहीवेळा शॉर्टसर्किट किंवा अन्य प्रकारे आग लागून कागदपत्रांच्या माध्यमातील रेकॉर्ड जळून खाक झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. कागद म्हंटले की चटकन पेट घेऊन हा हा म्हणता काही क्षणात आग सर्वत्र पसरते. या ठिकाणी आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी आपत्तीचा सामना करणारी यंत्रणा जाईपर्यंत काही वेळ लागतो. त्यामुळे आगीपासून रेकॉर्ड रुमचे संरक्षण करणे ही मोठी समस्या आपत्ती व्यवस्थापनसमोर होती. परंतु त्यातून आता मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रेकॉर्ड रुममधील आग काही वेळातच आटोक्यात आणणारी यंत्रणा उपलब्ध झाली आहे. `ऍटो फायर बॉल’ असे त्याचे नाव आहे. आग लागल्यास 30 सेकंदात हा बॉल फुटून त्यातील पावडर बाहेर पडून आग आटोक्यात येते. असे दीडशे बॉल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे दाखल झाले आहेत. यातील एका बॉलची क् किंमत 2000 रुपये इतकी आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे भविष्यात आगीमुळे रेकॉर्ड रुममधील होणारे नुकसान नक्कीच टळणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासह जिह्यातील सर्व प्रांताधिकारी कार्यालये, तहसिलदार कार्यालये येथील रेकॉर्ड रुममध्ये हे `ऍटो फायर बॉल’ लवकरच बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक कार्यालयात किमान पाच बॉल बसविण्यात येणार आहेत.

प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

धुराच्या ठिकाणी मदतकार्य करणारी ब्रिबिं ऍपॉरेटेस यंत्रणा

एखाद्या ठिकाणी आग लागल्यास धुरामुळे मदतकार्य करण्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांना अडथळा निर्माण होतो. धुरामुळे श्वास गुदमरल्याने प्रसंगी जीव जाण्याचाही धोका असतो. अशा ठिकाणी धुरामध्ये बचाव कार्य करण्यासाठी  जवानांकरीता `ब्रिबिंग ऍपॉरेटेस’ ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. सिलिंडर व मास्क अशी यंत्रणा असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे सहा युनिट दाखल झाली आहेत. याची प्रत्येकी किंमत दीड लाख रुपये इतकी आहे.

Related Stories

कोल्हापूर : गोकुळमध्ये सत्ता द्या; ८५ % परतावा देऊ

triratna

चित्रपट कवी बापू घराळ काळाच्या पडद्याआड

triratna

पंतप्रधान योजनेतील रकमांचे कालकुंद्री पोस्टामार्फत वितरण

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार पासून कोव्हिशिल्ड’चा बुस्टर डोस

triratna

`आजरा’चा ताबा कारखाना संचालक मंडळाकडे

triratna

राजारामपुरीतील मुक्ता पब्लिकेशनवर `आयकर’चे छापे

triratna
error: Content is protected !!