तरुण भारत

कोरोनाचा कहर : देशात आजवर एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूची नोंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा रुग्ण संख्या कमी होताना दिसत असली तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा दररोज समोर येणारा आकडा भयावह आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी एक लाख पेक्षा कमी रुग्ण आढळून आले. मात्र,  मागील 24 तासात देशात 6,148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  हा आजवरचा एका दिवसतला सर्वाधिक करोना मृत्यूचा आकडा ठरला आहे. 

Advertisements

ताज्या आकडेवारीनुसार, भारतात मागील 24 तासात 94 हजार 052 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 2 कोटी 91 लाख 83 हजार 121 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 3,59,676 जणांनी आपला जीव गमावला आहे. 


बुधवारी देशात 1 लाख 51 हजार 367 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 कोटी 76 लाख 55 हजार 493 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून सद्य स्थितीत हा दर 94 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर मृत्यूदर 1.22 टक्के इतका आहे. 


सध्या देशात 24 लाख 11 लाख 67 हजार 952 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 33 लाख 79 हजार लसींचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत देशातील 23 कोटी 90 लाख 58 हजार 360 जणांना लस देण्यात आली आहे. 

आतापर्यंत देशात 37 कोटी 21 लाख 98 हजार 253 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 20 लाख 04 हजार 690 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 9 जून 2021) एका दिवसात करण्यात आल्या. 

Related Stories

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा मनसेत

prashant_c

जम्मू काश्मीर : नगरोटामध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान

pradnya p

इटलीत 6 कोटी लोक घरात कैद

tarunbharat

अकाली दलाने दिला भाजपला मोठा धक्का; युती तुटली?

prashant_c

भारतात 65 लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

देशात 14.77 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!