तरुण भारत

जिल्हय़ात लॉकडाऊन वाढविण्याचा विचार

पालकमंत्री करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोना रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. काही जिल्हय़ांचा अपवाद वगळता इतर ठिकाणी रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. बेळगाव जिल्हय़ात मात्र आणखी आठवडय़ाभरासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे.

पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. त्यामुळे आणखी किमान एक आठवडय़ाचा लॉकडाऊन वाढविण्यासंबंधी आपण गुरुवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण रुग्णसंख्या घटविण्यासाठी बेळगावला आणखी लॉकडाऊनची गरज आहे. पालकमंत्र्यांच्या या विधानावरून बेळगावात आणखी एक आठवडय़ाचा लॉकडाऊन वाढणार का, यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे. कारण सध्या बेळगावला पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 8.9 टक्के इतकी आहे. सरकारने ठरविलेल्या मार्गसूचीनुसार रुग्णसंख्या 5 टक्क्मयांवर उतरल्यानंतर लॉकडाऊन उठविण्यात येणार आहे. बुधवारी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांशी चर्चा केली असून आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी किमान आणखी एक आठवडा लॉकडाऊन वाढविण्याचा सल्ला दिला आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर यासंबंधीचा निर्णय होणार आहे.

Related Stories

परराज्यामधून येणाऱया नागरिकांची गर्दी ओसरली

Patil_p

परिवहन कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांची निदर्शने

Amit Kulkarni

ड्रेनेज चेंबर बांधण्यासाठी वाळूऐवजी चिपिंगचा वापर

Patil_p

शुक्रवार ठरला ‘ब्लॅक फ्रायडे’ आणखी 11 रुग्णांची भर

Patil_p

मुचंडी गावात स्टीमर मशीनचे (वाफ यंत्र) वितरण

Amit Kulkarni

शांतीसागर मुनींच्या स्मारकाचे लोकार्पण

Amit Kulkarni
error: Content is protected !!