तरुण भारत

कर्नाटकातील २२ जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यातील २२ जिल्ह्यात २५ मे ते ८ जून या कालावधीत शहरीपेक्षा ग्रामीण भागात कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण प्रकरणांपैकी ५० ते ८५ ही नोंद झाली आहे.

कोरोना वॉर रूमच्या आकडेवारीनुसार, हासनमध्ये ग्रामीण भागात सर्वात जास्त प्रमाणात कोरोनाचे प्रमाण दिसून आले आहे. ग्रामीण भागात १०,१०० पेक्षा जास्त रुग्ण तर शहरी भागात ३,३६८ रुग्णांची नोंद झाली आहे. तुमकूरमध्ये शहरी भागात २,२१४ तर ग्रामीण भागात ७,८७६ रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे, असे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण, यांनी म्हंटले आहे. “आम्ही टास्कफोर्स बैठकीत आदेश दिला आहे की ग्रामीण भागातील कोणत्याही कोविड पेशंटला घरी एकटे ठेवू नये. त्यांना एकतर आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले ग्रामीण भागात कोरोना या प्रसाराला आळा घालणे आवश्यक आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटक: परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना २८ दिवसानंतर मिळणार लसीचा दुसरा डोस

Abhijeet Shinde

राज्य परिवहन कर्मचारी पुन्हा आक्रमक

Amit Kulkarni

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

Abhijeet Shinde

चामराजनगर घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना काँग्रेसकडून लाखाची मदत

Amit Kulkarni

कर्नाटक: पक्ष बळकट करण्याची गरज : कुमारस्वामी

Abhijeet Shinde

‘अनादर राउंड’ चित्रपटाने इफ्फीला सुरुवात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!