तरुण भारत

सांगेलीत आज रात्रीपासुन आठ दिवसांचा जनता कर्फ्यू

गाव बैठकीत एकमताने निर्णय : नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई

ओटवणे / प्रतिनिधी:

Advertisements

सांगेलीत सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असून यात काही जणांचा मृत्यूही झालेला आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सांगेलीत आज गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून गुरूवारी १७ जून रात्री १२ पर्यंत आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय  गावबैठकीत एकमताने घेण्यात आला. या कडक लॉकडाऊनमधून मेडिकल, डाँक्टर या अत्यावशक सेवेसह सध्या खरीप हंगामास प्रारंभ झाल्याने शेतकरी वर्गाला वगळण्यात आले आहे. तसेच या जनता कर्फ्यूमध्ये गावात नियमांचे कोणीही उल्लंघन केल्यास तसेच विनामास्क कोणीही आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी घरोघरी जंतुनाशक फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन जनता कर्फ्यू मध्ये रेशन दुकानही बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच माडखोल – सांगेली नवीन रस्ता वाहतुकीस  बंद ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

रत्नागिरी : कोकण मार्गावर आजपासून धावणार ‘मडगाव-मुंबई फेस्टिवल स्पेशल’

triratna

सावजासह शिकारीही गतप्राण

Patil_p

दापोलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याने प्रशासनाची धावपळ

triratna

रत्नागिरी : अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर धोकादायक ठिकाणच्या कुटुंबियांचे स्थलांतर

triratna

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ.संघमित्रा फुले

Patil_p

केवळ अत्यावश्यक वाहतुकीला परवानगी

Patil_p
error: Content is protected !!