तरुण भारत

अमेरिकेत टिकटॉक, व्हीचॅट यासारख्या चीनी ॲपवरील बंदी उठली

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक (TikTok), व्हीचॅट (WeChat) सारख्या चीन ॲपवर  बंदी घातली होती. पण आता राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना निर्णय खोडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये टिकटॉक आणि वीचॅटवर घातलेली बंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या बायडेन प्रशासन आता ॲपचे स्वतः पुनरावलोकन करून निर्णय घेणार आहे. पण यासंबंधीत आदेशावर जो बायडेन यांनी स्वाक्षरी केली आहे.

Advertisements


आता अमेरिकन वाणिज्य सचिव चीन कंपन्याच्या मालकीचे या ॲपची तपासणी करेल. कारण या ॲपमुळे अमेरिकन डेटा गोपनियता किंवा राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण करू शकते. दरम्यान अमेरिकेत टिकटॉकचे 10 कोटींहून अधिक युजर्स आहेत.


अमेरिका आणि चीन यांच्या तणावा दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला एक मोठा झटका दिला होता. ट्रम्प यांनी आठ चिनी ॲपवर बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. हे सर्व ॲप चिनी कंपनीशी संबंधित होते. या ॲपद्वारे युजर्सचा डाटा चीन सरकारपर्यंत पोहोचत होता, असे ट्रम्प यांचे म्हणणे होते. पण आता ट्रम्प यांच्या बंदी निर्णय रद्द करण्याच्या आदेशावर बायाडेन यांनी स्वाक्षरी केली आहे. 


दरम्यान, भारताने देखील टिकटॉक सारख्या चिनी ॲपवर बंदी घातली आहे. भारताने आतापर्यंत 224 चिनी ॲपवर बंदी घातली आहे, या निर्णयाचे अमेरिकन प्रशासन आणि खासदारांनी स्वागत केले होते.

Related Stories

केवळ सुटीसाठी एकाच मुलीशी चारवेळा विवाह

Patil_p

महाराष्ट्रातील 203 विद्यार्थी अडकलेत रशियात

datta jadhav

आदेश पाळा : पोप

Patil_p

बांगलादेशच्या मशिदीत विस्फोट, 12 जणांचा मृत्यू

Patil_p

तणावाच्या कारणास्तव जगातील ‘चिप’ उद्योगात चढउतार

Patil_p

चीनमध्ये 3 वर्षापुढील मुलांचेही लसीकरण

datta jadhav
error: Content is protected !!