तरुण भारत

रत्नागिरी :’विस्टाडॅम’ रेल्वे पहिल्यांदाच धावली कोकण मार्गावरून

आरामदायी प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्माण केलेली प्रवासी सेवा

प्रतिनिधी / रत्नागिरी

Advertisements

खरतर कोकण रेल्वे ज्या मार्गावरून धावते त्या मार्गावरील निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला भुरळ पाडते. आजूबाजूला डोळे सुखावणारी हिरवाई, नीळ आकाश, डोंगरमाथे आणि पावसाळ्यात ओसंडणारे धबधबे स्वर्गीय अनुभव देतात आणि प्रवास सुखकर होतो. मात्र नेहमीच्या रेल्वेच्या गाडीतून हा अनुभव पूर्णपणे मिळतोच असे नाही. प्रवाशांच्या या आवडीला डोळ्यासमोर ठेवून कोकण रेल्वेने ‘विस्टा डॅम’ ही वेगळी रेल्वे तयार केली आहे. हि रेल्वेगाडी आज गुरुवारी कोकण रेल्वे मार्गवरून प्रथमच धावली.

जनशताब्दी या रेल्वेत स्पेशल बोगीला प्रशस्त काचा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे ट्रेनच्या खुर्चीत बसून एक वाईड व्ह्यू अनुभवता येतो. मोठमोठ्या खिडक्या बरोबरच बोगीत प्रशस्थ जागा आहे. यातील खुर्च्या मागे पुढे होतातच, पण गोल ही फिरतात. यामुळे प्रवासी आपल्याला हव्या तशा खुर्च्या ऍडजस्ट करू शकता. यास्पेशल बोगीत फ्रीज डीप फ्रीज बरोबरच ओव्हन व अन्य सुविधा आहेत . सर्व सोयी सुविधां असणारी ही रेल्वे पर्यटक प्रवाशांना सुखावणारी आहे. याच विस्टा डॅम रेल्वे चा पहिला प्रवास आज गुरुवारी 10 जून रोजी कोकण रेल्वे मार्गावरून झाला. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर यादिवशी सकाळी या स्पेशल रेल्वे चे आगमन झालेले होते.10 मिनिटे थांबा घेऊन हि रेल्वे पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली.

जनशताब्दी रेल्वे गाडीला जोडलेल्या या बोगीचे छप्पर ही काचेचे असून बोगी च्या मागील बाजूचे दालन विशेष आहे. यात उभे राहून मोठ्या काचेतून आपण कोकणचा निसर्ग अनुभवू शकतो. या रेल्वे सेवेमुळे येथील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात १३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

एका मोहिमेत दोन कारवाया फत्ते

NIKHIL_N

कोकण मार्गावर २ ऑक्टोबर पासून राजधानी एक्सप्रेस धावणार

Shankar_P

नरडवे प्रकल्पांतर्गत रॉयल्टीमध्ये गैरव्यवहार!

NIKHIL_N

‘करोना’ बाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेचा अलर्ट!

Patil_p

अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!