तरुण भारत

बिहार : हाजीपुरमध्ये दिवसा उजेडात एचडीएफसी बँकेत 1 कोटी 19 लाखांची लूट

  • बँक कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस ठेवून घातला दरोडा 


ऑनलाईन टीम / वैशाली :


बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपुरातील जरुआची मध्ये बँकेतून लुटमार करण्यात आली आहे. पाच दुचाकीवरून आलेल्या लुटमारांनी एचडीएफसी बँकेतून दिवसा उजेडात दरोडा टाकत एक कोटी 19 लाखांची लूटमार केली असल्याची माहिती मिळाली आहे. 

Advertisements


 गुरुवारी बँक उघडल्यानंतर काही वेळातच सकाळी अकराच्या सुमारास दरोडेखोरांनी आवारात प्रवेश केला आणि आतून दरवाजा बंद करून घेत दरवाजाला कुलूप लावले. यानंतर त्यांनी बँक कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस ठेवले आणि दरोडा टाकला. दरोडेखोरांनी ग्राहकांचे 44 हजार रुपयेही काढून घेतले. 

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तिरहूत रेंजचे आयजी गणेश कुमार आणि वैशाली एसपी मनीष यांनी गुन्हेगारीच्या ठिकाणी येऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजद्वारे पुढील  तपास करीत आहेत.


बँक उघडल्यानंतर थोड्याच वेळात लुटमार बँकेत शिरले आणि शस्त्राच्या बळावर त्यांनी हा गुन्हा केला आणि ते तेथून पळून गेले. शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते.  

दरम्यान, एचडीएफसी बँक केंद्रीय मंत्र्याच्या घराजवळ आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे घर एचडीएफसी बँकेच्या अगदी थोड्या अंतरावर आहे जिथे अतिरेक्यांनी इतका मोठा दरोडा टाकला आहे.  

Related Stories

भाजपसोबत राहण्यासाठी ‘या’ आमदाराला रश्मी शुक्लांनी धमकावलं ; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

triratna

तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून सुरुवातीलाच रोखावे !

Patil_p

कोरोना काळात भारतातून ऑक्सिजनची दुप्पट निर्यात

datta jadhav

1993 मध्ये निदर्शने, 27 वर्षांनी आरोपपत्र

Amit Kulkarni

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक- राजेश टोपे

triratna

‘लेदर’ नाही, आता ‘प्लेदर’

Patil_p
error: Content is protected !!