तरुण भारत

गॅस सिलेंडर देणाऱ्या 34 सेवादूतांचा मातृशक्तीच्या हस्ते सन्मान

ऑनलाईन टीम / पुणे :

गृहिणींच्या स्वयंपाकघराच्या कामातील महत्त्वाचा दुवा असलेल्या सिलेंडर डिलिव्हरी देणाऱ्या कामगारांचा सन्मान मातृशक्तीच्या हस्ते करण्यात आला. अन्न-वस्त्र-निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. गृहिणींना स्वयंपाकघरात सिलेंडर म्हणजे अत्यावश्यक घटक. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वेळेवर घरोघरी सिलेंडर पोहोचविणाऱ्या सेवादूतांचा सन्मानपत्र व किराणा किट देऊन सन्मान करण्यात आला.

Advertisements

पंचकन्या, ध्वज फाऊंडेशन आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या वतीने शिवाजीनगर कोर्टाजवळील पासलकर गॅस एजन्सीमधील 34 सेवादूतांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पासलकर गॅस एजन्सीचे पंढरीनाथ पासलकर, पंचकन्या संस्थेच्या अ‍ॅड.प्रार्थना सदावर्ते, ध्वज फाऊंडेशनचे अ‍ॅड.शिरीष थिटे, प्रणव आमडेकर, आकाश मोकाशी, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, अरुणकुमार बाभुळगांवकर, सुरेश तरलगट्टी उपस्थित होते.

अ‍ॅड. प्रार्थना सदावर्ते म्हणाल्या, कोविड महामारीच्या काळात कोणतीही तक्रार न करता, घरी सिलेंडर पोहोचविणाऱ्या या सेवादूतांचे कार्य मोठे आहे. कुटुंबातील सर्व सदस्य घरातच असल्याने गॅस सिलेंडरची आवश्यकता नेहमी असे. त्यात स्वत:चा जीव धोक्यात घालून सिलेंडर डिलिव्हरी देणाऱ्यांनी आपले काम केले. त्यामुळे आम्ही गृहिणी यांचा सन्मान करीत आहोत.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, खऱ्या अर्थाने गरज असताना या घटकाने काम केले आहे. घरपोच गॅस सिलेंडर मिळत असल्याने गृहिणींना फारशी अडचण आली नाही. त्यामुळे आरोग्याशी निगडीत सेवा देणाऱ्यांप्रमाणे हे देखील कोरोना काळातील महत्त्वाचे सेवादूत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

श्रीक्षेत्र तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सव अत्यंत साधेपणाने होणार

Shankar_P

Sambhaji raje Chhatrapati Live : आमचा सरळ आणि थेट विषय सकल मराठा समाजाला न्याय -खासदार संभाजीराजे छत्रपती

triratna

महाराष्ट्रात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

prashant_c

फळांच्या राज्याची अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एपीएमसीमध्ये 50 हजार पेट्यांची आवक

triratna

महाराष्ट्रात कोरोना : मागील 24 तासात 58,924 नवे रुग्ण; 351 मृत्यू

pradnya p

सोलापूर : इंधन दरवाढी विरोधात माकपचे निदर्शन

triratna
error: Content is protected !!