तरुण भारत

मदत : अमेरिका 92 देशांना दान करणार फायझरच्या 50 कोटींपेक्षा अधिक लस

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 


अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरात कोरोना विषाणूचा घातक परिणाम पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिका प्रशासन कोरोना लस दान करण्यासाठी फायझर बायो एन टेक लशीचे 50 कोटी डोस खरेदी करणार असून 92 देशांमध्ये वितरित करणार आहे. तसेच अध्यक्ष जो बायडेन G-7 बैठकीत घोषणा करतील असे सांगितले.

Advertisements


जगातील बऱ्याच देशात लशीची कमतरता आहे. जो बायडेन निर्णयामुळे त्या देशांना मदत होईल. अमेरिकेत लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक लोकांना लशीचे दोन्ही डोस दिले आहेत. त्यानंतर तेथील कोरोना मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्ष जो बाइडन यांनी ब्रिटनमधील 7 देशांसोबत G7 बैठकीच्या पूर्वी ही लस देण्याचे संकेत दिले आहेत. प्रत्यक्षात जेव्हा स्थानिक माध्यमांनी बाइडन यांना विचारले की, जगातील लोकांना कोरोना लस देण्याचे धोरण आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘माझ्याकडे एक धोरण आहे आणि मी ते लवकरत जाहीर करीन’.असे सांगितले होते.


बाइडन यांनी ही घोषणा फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बौर्ला यांच्यासह करणार आहे. ही घोषणा अमेरिकेच्या हितासाठी नसून जगाच्या हितासाठी करण्यात येणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

  • ऑगस्टपासून सुरू केला जाईल लसींचा पुरवठा 


लसींचा पुरवठा ऑगस्ट 2021 पासून सुरू केला जाणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत 20 कोटी लसींचा पुरवठा केला जाईल. तर अन्य 30 कोटी लसी 2022 च्या पहिल्या सहा महिन्यात दिले जातील. 

Related Stories

‘फायझर-बायोएनटेक’ला WHO चे ग्लोबल ॲप्रूव्हल

datta jadhav

जपानमधील लोकांचा रोबोट्सकडे वाढता कल

Patil_p

विमानवाहतूक सुधारायला 2024 उजाडणार

Patil_p

अमेरिका खेळात परतली आहे !

Omkar B

पाकिस्तानात हिंदुंच्या मंदिराची तोडफोड; मूर्तीची विटंबना

prashant_c

अमेरिकेत एच -1 बी व्हिसावरील निर्बंध शिथिल; भारतीयांना दिलासा

datta jadhav
error: Content is protected !!