तरुण भारत

भाजप नेत्याने संसदेतील ‘तो’ व्हिडिओ शेअर करत दिला नुसरत जहाँच्या लग्नाचा पुरावा

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ उद्योगपती निखिल जैनसोबत लग्नच मान्य नसल्याचे सांगून वादात अडकली आहे. तिच्या लग्नाच्या वादामुळे नुसरत जहाँची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करत नुसरत जहाँ यांच्या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

अमित मालवीय यांनी नुसरत जहाँचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, .तृणमूल खासदार नुसरत जहाँ रुही जैन यांचे हे खासगी आयुष्य आहे. त्या कोणासोबत लग्न करतात, कोणासोबत राहतात याच्याशी कोणाचा काही संबंध असता कामा नये. पण त्याही पलीकडे जाऊन त्या एक लोकप्रतिनिधी आहेत. मग अशावेळी भर संसदेत नुसरत जहाँ यांनी निखिल जैनसोबत लग्न केल्याची घोषणा केली होती. हे संसदेच्या रेकॉर्डवर आले आहे. आता त्या लग्न नाकारत आहेत. मग त्या संसदेत खोटे बोलल्या का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.या एका वाक्यामुळे नुसरत जहाँ अडचणीत येऊ शकते…

नुसरत जहाँ संसदेत शपथ घेताना म्हणाली होती, सलाम वालेकुम नमस्कार असे म्हणत मी, नुसरता जहाँ रुही जैन….अशी शपथ घेतली होती. त्यावेळी नुसरत जहाँ यांच्या भांगेत कुंकू आणि हातात लाल चुडा होत तसेच हातावर मेंहदी देखील होती. त्यावेळी नुसरत जहाँच्या शपथ विधी इतकीच तिच्या या नव्या नवरीच्या लूकची देखील चर्चा झाली होती.

या सगळ्या प्रकरणावर नुसरतची प्रतिक्रिया

नुसरत जहाँने याप्रकरणावर पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणाली की, परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. त्याशिवाय हा एक दोन भिन्न धर्मीय व्यक्तींमधील विवाह असल्याने त्याला भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही. कायदेशीररीत्या हा विवाह वैध नाही आहे. तर हे केवळ एक नाते किंवा लिव्ह इन रिलेशनशिप आहे. त्यामुळे त्यातून बाजूला होण्यासाठी घटस्फोट घेण्याची गरजच नाही, असे स्पष्टीकरण तिने दिले आहे.

Advertisements

Related Stories

भारतातील बळींमध्ये वाढ

Patil_p

ICICI बँकेचे गुजरातमधील मुख्यालय येणार मुंबईत

datta jadhav

मुंबईत पेट्रोल दराची ‘शंभरी’कडे वाटचाल

Patil_p

यंदा कडक उन्हाळा

datta jadhav

कृषी विधेयकांचे कायद्यात रुपांतर

Patil_p

‘कोरोना वॉरियर्स’ना तिन्ही दलांकडून मानवंदना

pradnya p
error: Content is protected !!