तरुण भारत

निग्यानट्टी येथे बेकायदा दारु जप्त

युवकाला अटक, काकती पोलीसांची कारवाई

 प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

निंग्यानट्टी (ता. बेळगाव) येथे बेकायदा दारु विकणाऱया एका युवकाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली असून काकती पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

निंग्यानट्टी येथे बेकायदा दारु विक्री करण्यात येत असल्याचे समजताच बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून मारुती बसवाणी तळवार या युवकाला अटक केली. त्याच्या जवळून 90 लीटर दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.

काकती पोलीस स्थानकात कर्नाटक अबकारी कायदा 32, 34 व संसर्गजन्य रोगप्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

देसूरच्या सुपुत्राची सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्ती

Patil_p

रक्तदान करून हुतात्म्यांना अभिवादन

Amit Kulkarni

झुआरीनगर वस्तीतील लोकही आले रस्त्यावर

Patil_p

कोरोना प्रवेशाने निपाणी हादरली

Patil_p

बेळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

Prasad_P

म.फुले मार्केटची याचिका फेटाळली, पण खंजर गल्ली गाळय़ाचा लिलाव रद्द

Patil_p
error: Content is protected !!