तरुण भारत

कराडला होणार जंबो कोव्हिड सेंटर

लहान मुलांसाठी स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल, जिल्हाअधिकाऱयांकडुन जागेची पहणी.

वार्ताहर / कराड

Advertisements

कोरोनाच्या तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असुन त्यादृष्टीने आत्तापासुनच उपाययोजना राबवण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार कराडला जंबो कोव्हिड सेंटर व लहान मुलांचे स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी गुरूवरी जिल्हाअधिकारी शेखर सिंह यांनी शहरातील 5 जागांची पहाणी केली. यावेळी, प्रांतअधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, तालुका वैद्याकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, मंडलअधिकारी महेश पाटील आदींची प्रमुख उपस्थीती होती.

कराड तालुका सुरवातीपासुनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱया लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आत्तापासुनच कंबर कसली आहे. गावांगावांत विलगीकरण करू स्थापन करण्यात आले आहेत. तर बाधिताच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी मोहिम गतीमान करण्यात आली आहे.

कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यानंतर रूग्णालयांतील बेडची संख्या अपुरी पडत आहेत. त्यामुळे जिल्हाप्रशासनाने कराडला जंबो कोव्हिड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तर तिसऱया लाटेत प्रामुख्याने लहान मुलांना जास्त धोका असल्याने कराडला लहान मुलांसाठी स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाअधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, जुने तहसिल कार्यालयाची ईमारत, उपजिल्हा रूग्णालय, पंचायत समितीचे यशवंतराव चव्हाण सभागृह व मुख्याधिकाऱयांचे निवासस्थान अशा पाच जागांची पहाणी केली. पहाणी दरम्यान यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे जंबो कोव्हिड सेंटर व उपजिल्हा रूग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल उभारण्यासाठी अनुकुलता दर्शवीली आहे.

दरम्यान जिल्हअधिकाऱयांनी कराड शहर व तालुक्यात राबवण्यात येणाऱया उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच सध्या बाधितांची संख्या कमी होत असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाने निष्काळजीपणा न करता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. प्रशासनाने तिसरी लाट येणारच आहे असे गृहीत धरून उपाययोजना राबवाव्यात. शहरात व गावांत व्यधिग्रस्तांची नियमित तपासणी व सर्व्हे सुरूच ठेवावा, बाधितांच्या संपर्कात येणाऱया जास्तीत जास्त लोकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना तपासणी करावी. बाधितांचे मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने विषेश उपाययोजना राबवण्याबाबत त्यांनी अधिकाऱयांना सुचना केल्या.

Related Stories

पेट्रोल अखेर शंभरी पार

Patil_p

जी.एस.टी. परताव्याची राज्यांना गरज : खा. श्रीनिवास पाटील

Patil_p

बाधितांशी कसा काय संपर्क साधला जातोय ?

Patil_p

सामाजिक वनीकरणानेच घेतला बाळसे धरण्यापूर्वीच झाडांचा बळी

Patil_p

सातारा : पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

datta jadhav

सातारा सैनिक स्कूलमध्ये मिळणार मुलींनाही प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!