तरुण भारत

साताऱयात भाजी विक्रेत्यांना पोलिसांची मारहाण

हिटलरशाही बंद करा : पोलीस अधिक्षक बंसल यांना निवेदन

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

प्रशासनाच्या चुकीमुळे अपलोड घोटाळा झाला आणि जिल्हा कडक लॉकडाऊन झाला. आता अनलॉक चारमध्ये जिल्हावासियांना थोडीशी सूट मिळाली आहे. परंतु पोलीस मात्र पराचा कावळा करत अधिकार गाजवू लागले आहेत. शहरात भाजी विक्रेत्यांना मारहाणीपर्यंत पोलिसांची मजल गेली आहे. दिड वर्षे झाले कोरोनाने जगणं असहय़ झाले असताना पोटासाठी प्रत्येकजण काही तरी करत आहे परंतु प्रशासन मात्र त्यांच्या मुळावरच उठलं आहे. सातारा जिल्हय़ात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लावण्यात आल्याने हातावर पोट असणाऱयांचे जगणे अवघड झालेय. नियम पाळले पाहिजेत हे मान्य असले तरी लोक देखील जगली पाहिजेत हे महत्वाचे आहे. मात्र, सातारा शहर पोलिसांचे मटका, जुगार, दारुविक्रीला अभय आणि भाजीपाला विक्रेत्या महिलांना मारहाण असा प्रकार सुरु आहे. ही हिटलरशाही बंद करा, अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे करण्यात आलीय.

याबाबत जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे, प्रदेश महिला कमिटीच्या असंघटित महिला विभागाच्या शहराध्यक्षा मनिषा पाटील व जिल्हा एनजीओ महिला सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्या पल्लवी यादव यांनी बंसल यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहरात लॉकडाऊन असला तरी अवैध मटका, जुगार, दारु विक्री सुरु असते. त्याला पोलीस दलाकडून किरकोळ कारवाया करुन सोडले जाते. मात्र, केवळ पोटासाठी भाजी विक्री करणाऱया वयोवृध्द लोक, महिलांना सातारा शहर पोलिसांकडून मारहाण केली जात आहे. त्यांच्या वयाचे भान न ठेवता त्यांना एकेरी भाषेत पोलीस बोलत आहेत.

  यापुढे कोणत्याही भाजी विक्रेत्याला मारहाण झाली तर गोरगरीब विरुध्द पोलीस असा संघर्ष सुरु होईल याचे भान ठेवावे. वयोवृध्द लोकांना, महिलांना मारहाण करण्याचे लायसन्स पोलीस प्रशासनाने काढले आहे का? राहूल खाडे नावाचा पोलीस कर्मचारी लोकांना एकेरी भाषेत बोलतात. वयाचा मान ठेवत नाही. दुकानदार, विक्रेते, सातारकर काय गुन्हेगार आहेत का? संबंधितांची चौकशी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आलीय.

संबंधितावर कारवाईचे आश्वासन

ज्या महिला व विक्रेत्यांना मारहाण झाली त्यांच्यासमवेत बंसल यांची भेट घेण्यात आली. ज्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱयांनी मारहाण केली त्यांच्याबाबत तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी संबंधितांची चौकशी करुन दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन राजेघोरपडे व पाटील यांना दिले.

पोलीस महिलांना मारहाण कशी करतो?

भाजी विक्रेत्या महिला या गुन्हेगार नाहीत. लॉकडाऊन काळात त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्या रस्त्यावर भाजी विक्री करण्यासाठी येतात हाच त्यांचा गुन्हा झाला मग जगायचे कसे हा देखील सवाल आहे. त्यातच या महिलांना पुरुष पोलीस कर्मचाऱयाने केलेली मारहाण ही बेकायदा असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मटका, दारु, जुगार सुरु अन् भाजी विक्रेत्यांना मारहाण हे बंद करा, अन्यथा सातारकर प्रशासनाला नेहमीच सहकार्य करत आलेत मात्र अशा घटना घडत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मनिषा पाटील यांनी दिला आहे.

Related Stories

सातारा : दिवसा ढवळय़ा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वीजेची चोरी

triratna

जिल्हय़ात आठ मटका अड्डय़ांवर छापे

Amit Kulkarni

बेरोजगारी, गरिबीतून तीन युवकांची आत्महत्या

Patil_p

सातारा : मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूलने विनाकारवाई सोडले?

datta jadhav

मनोरूग्ण तरुणाने मंगळवार पेठेत सात गाड्या फोडल्या

Shankar_P

ऑनलाईन बँकिगद्वारे साडेतीन लाखाची फसवणूक

Patil_p
error: Content is protected !!