तरुण भारत

स्मशानभूमीचे काम प्राधिकरणानेच करावे

अशोक मोनेंचा प्रश्नांचा भडीमार : नगराध्यक्षा अन् मोनेंच्यात जुगलबंदी,मुख्य लेखाधिकाऱयांची सभेलाच दांडी

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली. या सभेत अजेंडय़ावर 51 विषय होते. विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी सत्ताधाऱयांना नगराध्यक्षा फंडातील कामांचे विषय अजेंडय़ावर घेतले आहेत. त्याचे अंदाजपत्रक दराची माहिती सभागृहास आहे काय?, अशी विचारणा केली. कास धरणाचे काम प्राधिकरणामार्फत केले जात आहे. तर तेथील स्मशानभूमीचे कामही त्यांनीच केले पाहिजे, असेही त्यांनी या सभेत मांडले. दरम्यान, एकटय़ा अशोक मोने यांनीच एकटय़ाने सत्ताधाऱयांना धारेवर धरले. सर्व विषय मंजूर करण्यात आले.  

गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेला नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांच्यासह मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते. या सभेत प्रभाग 12 मध्ये सदाशिव पेठेत मोमीन ट्रेडर्स ते खण आळी काँक्रीट रस्त्याच्या 4 लाख 4170 रुपयांच्या कामास मंजूरी देणे, शाहुपूरी करंजे येथील सैनिकी मुलींचे वस्तीगृह येथे टॉयलेट बांधण्याच्या आलेल्या सुजित भोसले यांच्या 4.80 टक्के कमी दरास मंजूरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर कास येथील स्मशानभूमी बांधकाम करण्याकामी अंदाजपत्रकीय दरापेक्षा 5.20 टक्के या सर्वात कमी दरास मंजूरी देण्यात आली. मात्र, याच विषयावरुन अशोक मोने यांनी यावर आक्षेप घेतला. कास धरणाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करत आहे. त्यांनीच हे स्मशानभूमीचे काम करुन दिले पाहिजे. पालिकेने स्मशानभूमी कशाकरता बांधून द्यायची, असा सांगितले.

तसेच विषय पत्रिका वाचन करताना त्यावर नगराध्यक्षांच्या फंडातील कामांना मंजूरी देण्यापूर्वी त्या कामांचा पूर्णपणे आराखडा घेतला आहे काय?, त्याची माहिती सदस्यांना आहे काय?, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर प्रशासनाच्यावतीने व सत्ताधाऱयांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चांगलाच घाम फुटला होता.

आरोग्य विभागाच्या विषयांची संख्या जास्त

या स्थायी समितीत बहुतांशी विषय हे दर मंजूरीचे असले तरीही त्यात आरोग्य विभागाच्या विषयांची संख्या अधिक होती. हद्दवाढ झालेल्या भागातील कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदार नेमने, गटर बंदिस्त करण्याचे काम करणे आदी कामांचा समावेश होता.

मुख्य लेखाधिकाऱयांची दांडी स्थायी समितीची सभा असल्याने उपस्थित होणाऱया प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील म्हणून पालिकेच्या मुख्यलेखाधिकारी आरती नांगरे -पाटील यांनी गुरुवारी गैरहजेरी लावली. त्यांच्या अचानक सुट्टीवर जाण्याचे कारण पालिकेतील आस्थापना विभागालाही समजू शकले नाही.

Related Stories

रिक्षा चालकांना २२ मे पासून मिळणार अर्थसाह्य

triratna

प्रतिमा कुतिन्होविरुद्ध कोर्टात आरोपपत्र सादर

Patil_p

पोलिस निरीक्षकांसमोर एकावर चाकूने वार

Patil_p

सृष्टी रासकर हिची भारतीय बॉक्सिंग संघात प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

Omkar B

रॅट चाचणीत त्रुटी आढळल्याने 2 लॅब बंद

datta jadhav

कामथीच्या शेतकऱ्याने दोन पोलीस चौक्या केल्या निर्जंतुक

triratna
error: Content is protected !!