तरुण भारत

सक्रीय रूग्ण आले 10 हजारावर

माझे मुल, माझी जबाबदारी मोहिमेचा आज शुभारंभ : जिल्हय़ात 2613 बेड रिक्त,881 रूग्ण पॉझिटिव्ह,1453 जणांना डिस्चार्ज

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने जिल्हय़ातील स्थिती झपाटय़ाने सुधारत आहे. सक्रीय रूग्णांचे प्रमाण 10 हजारावर आल्याने जिल्हय़ाला दिलासा मिळाला आहे.  जिल्हय़ातील 2613 बेड शुक्रवारी रिक्त होते. दुसरी लाट ओसरू लागल्याने प्रशासन आता तिसऱया संभाव्य लाटेला तोंड देण्यासाठी सज्जता करत असून याचाच एक भाग म्हणून माझं मुल, माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी 11 मे रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे होणार आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या अहवालात 881 रूग्ण बाधित आले असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सायंकाळी 1443 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

फलटणची रूग्णसंख्या नियंत्रणात

जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 881 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. रूग्णवाढीचे उच्चांकी आकडे नोंदलेल्या फलटण तालुक्याची स्थिती सुधारत असून येथील रूग्णसंख्या शंभराच्या खाली आहे. तर सातारा व कराडमधील रूग्ण प्रमाण कायम आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे – जावली 25 (7977), कराड 179 (24169), खंडाळा 108 (11138), खटाव 134 (17758), कोरेगाव 66 (15469), माण 43 (12169), महाबळेश्वर 2 (4142), पाटण 40 (7527), फलटण 62 (27337), सातारा 178 (37349), वाई 35 (12047) व इतर 9 (1150) असे आजअखेर एकूण 178232 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

कराड तालुक्यातील एकूण मृत्यूसंख्या 700

जिल्हय़ात मृत्यूचे प्रमाण कायम आहे. गेल्या चोवीस तासात 28 मृत्यू झाले असून सर्वाधिक 11 मृत्यू कराड तालुक्यात आहेत. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे- जावली 0 (182), कराड 11 (700), खंडाळा 0 (142), खटाव 3 (440), कोरेगाव 3 (346), माण 2 (238), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (165), फलटण 1 (267), सातारा 6 (1129), वाई 0 (315) व इतर 0 असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 3968 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

1453 नागरिकांना डिस्चार्ज

जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1453 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. बाधितांच्या प्रमाणात कोरोनामुक्ती जास्त आहे.

Related Stories

साताऱ्यात १९ जणांचे अहवाल बाधीत तर ६४ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

triratna

कोरेगावमध्ये ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली

triratna

गुरुजींची शाळा बंद सर्व्हे सुरू

Patil_p

सातारलाही बनावट क्रीडाप्रमाणपत्राच्या संसर्गाची बाधा!

Patil_p

जगतापवाडीत पाण्यातून अळ्या येण्याचे प्रकार थांबणार

datta jadhav

सातारा : पालिकेच्या अतिक्रमण विभागाची टुकूटूकू कारवाई

datta jadhav
error: Content is protected !!