तरुण भारत

शहरातील दोन दारुच्या दुकान मालकांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या नियमाची पायमल्ली करत सातारा शहरातील दोन दारुची दुकाने सुरु असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर शाहुपूरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये सरोज वाईन शॉपचे मालक राजवर्धन मनोजकुमार वाडकर (वय 26, रा. तांदूळआळी), राधिका वाईनशॉपचे मालक चारुदत्त सुभाष बागल अशी त्यांची नावे आहेत.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओंकार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नियम मोडणाऱयांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिलेले आहेत. त्यानुसार दि. 9 रोजी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या आदेशानुसार ओंकार यादव, माने, फडतरे हे पेट्रोलिंग करत असताना मोती चौक तांदूळ आळी येथे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अविनाश चव्हाण, गणेश घाडगे आले. सर्वजण दुपारी 1 वाजता तपासणी करत असताना तेथील सरोज वाईन शॉप आणि राधिका वाईन शॉप ही दोन्ही दारुची दुकाने सुरु असल्याची दिसले. दोन्ही दुकानांचे मालक हे ग्राहकांना दारु विक्री करताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी विचारले की जिल्हाधिकाऱयांचा ग्राहकांना दारु घरपोहच करण्याचा आदेश आहे. तरी तुम्ही दारु विक्री करता कसे त्यावरुन त्या दुकानाचे मालक राजवर्धन वाडकर, चारुदत्त बागल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहुपूरी पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

महाबळेश्वर तालुक्यात वीज कोसळली, दोन गंभीर जखमी

triratna

कोयना धरण प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Patil_p

महाबळेश्वर तालुक्यातुन प्रथमच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने समाजकार्य विषयातील पीएचडी पदवी मिळवली

triratna

सातारा : अखेर समाधीला मिळाला मोकळा श्वास

Shankar_P

पुणे विभागातील भाजपाची मक्तेदारी मोडून काढूया – ना. बाळासाहेब पाटील

Shankar_P

कोव्हिड-19 लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!