तरुण भारत

साताऱयातील तीन सराईत चोरटे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

चोरी केलेल्या बॅटऱया छोटा हत्ती टेम्पोतून विक्रीसाठी घेवून आलेल्या साताऱयातील दोन सराईत चोरटय़ांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत कृष्णानगर येथील जलसंपदा गोडावूनमधील चोरीचा गुन्हा उघड केला. त्यांच्या ताब्यातील चोरीतील बॅटऱया व टेम्पो असा एकूण 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रोहित जितेंद्र भोसले (वय 24), अविनाश राजाराम भिसे (वय 24) व प्रकाश राजेंद्र शेंडगे (वय 22, सर्वजण रा. प्रतापसिंहगनगर, सातारा) अशी अटक केलेल्या सराईत चोरटय़ांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती दि. 8 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या सुचनेनुसार  गुन्हे प्रतिबंधक पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना प्रतापसिंहनगरकडून बाँबे रेस्टारंट येथे छोटा हत्ती टेम्पोतून चोरलेल्या बॅटऱया  विक्रीसाठी घेवून दोघेजण येत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने बॉम्बे रेस्टॉरन्ट परिसरामध्ये थांबून सापळा लावला त्यावेळी संबंधित माहिती मिळालेले वाहन कोरेगाव बाजूकडून सातारा बाजूकडे येताना दिसले.  त्याची थांबवून वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये 8 बटऱया आढळून आल्या. हे घेवून येणारे दोघेही सराईत गुन्हेगार होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या बटऱया कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाचे गोडावून मधून चोरल्या असल्याचे कबूल केले. त्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून 4,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या कारवाईत पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उत्तम दबडे, हवालदार कांतीलाल नवघणे, अतिष घाडगे, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, अमित सपकाळ, पो.कॉ. विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, धीरज महाडीक, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला होता.

Related Stories

जिल्हा रुग्णालयातील आरटी-पीसीआर यंत्रणा बंद

Patil_p

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंग निश्चित

Patil_p

दिलासा : वीस दिवसांनी बाधित वाढीचा वेग मंदावला

datta jadhav

सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवणाऱ्या दुकानांवर पालिकेचा दंडुका

Shankar_P

सातारा : शिवडे (उंब्रज) येथील एस. के. पेट्रोल पंपावर सहा जणांचा सशस्त्र दरोडा

triratna

बाधित रुग्णाच्या कुटुबांची अवहेलना करत असल्याचा तक्रार अर्ज पोलिसात

Patil_p
error: Content is protected !!