तरुण भारत

आदेश उल्लंघन करणाऱया 15 जणांवर गुन्हे

सातारा तालुका, शाहूपुरी पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

सातारा शहरात दुपारी 2 वाजल्यानंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱया तसेच दुकान सुरु ठेवल्याप्रकरणी 15 जणांवर सातारा तालुका व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी कारवाई केली. या सर्वांवर आदेश उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा ते कास रस्त्यावरील पॉवर हाऊसजवळ कार क्रमांक एम. एच. 11 एएस 9797 मधून विनाकारण फिरणाऱया इंद्रजित महेंद्र सुळके (रा. मंगळवार पेठ, सातारा), तसेच क्रेटा कार क्रमांक एम. एच. 10 सीआय 9708 मधून विनाकारण फिरणाऱया राहूल ईश्वर चव्हाण, विजय भगवान चव्हाण, अमोल देवाप्पा सूर्यवंशी, (रा. जांबवाडी, सांगली), सागर एकनाथ साळुंखे, (रा. पेठभाग सांगली), सागर, बाळासाहेब भंडारे, करण विजय गडकरी, ओमकार अविनाश परदेशी, अभिजित सुनील शिंदे व गणेश सुनील शिंदे (सर्वजण रा. गुरुवार पेठ, सातारा), यांच्यावर शाहूपुरी व सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याविरुध्द कॉन्स्टेबल धीरज मोरे, पोलीस नाईक विश्वनाथ आंब्राळे यांनी तक्रार दिलीय.

बोगदा ते यवतेश्वर रस्त्यावर दुचाकी भरधाव वेगाने चालवत विनाकारण फिरणाऱया भूषण मंगेश वाडेकर (रा. शनिवार पेठ, सातारा), मयुरेश चंद्रकांत सावंत (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. आदेश उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. समर्थ मंदिर चौकात झेरॉक्स, स्टेशनरी दुकान परवानगी नसतानाही उघडे ठेवणाऱया मोहन आबासाहेब शिर्के (रा. धस कॉलनी, समर्थ मंदिर, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांच्याविरुध्द हवालदार विश्वनाथ मेचकर यांनी तक्रार दिली आहे.

Related Stories

जनशक्ती, लोकशाहीला विकासापेक्षा अहंपणा महत्वाचा

Amit Kulkarni

सातारा : ३४ बळी, ७०८ कोरोनाबाधित, ५०० मुक्त

triratna

केंद्राने महाराष्ट्रावर कुरघोड्यांचे राजकारण करू नये

datta jadhav

सातारा : ४७६ रुग्णांना डिस्चार्ज

triratna

सातबारा उतारा दुरुस्तीसाठी एकाचे आमरण उपोषण

Patil_p

सातारा : निपाणी मुरातली पोरं शिकतात संगणकावर शाळा

triratna
error: Content is protected !!