तरुण भारत

होमगार्ड, पोलीसाला जखमी करणाऱयावर गुन्हा

साताऱयातील घटना : पेट्रोलिंग करत असताना दुचाकीला कारची धडक

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

पोलीस दलाच्या पेट्रोलिंग वाहनाला धडक देवून त्यावर पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड जवानास जखमी केल्याप्रकरणी ऋतिक जितेंद्र शिंदे (वय 21 रा. साईबाबा मंदिर, गोडोली, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार पोलीस कॉन्स्टेबल निलेश निकम (वय 29, नेमणूक, शहर पोलीस ठाणे) हे दि. 8 रोजी बीट मार्शल दुचाकीवरुन पेट्रोलिंग करत होते. त्यांच्यासोबत पाठीमागे एक होमगार्ड जवानही होता. यावेळी गोडोली नाका येथे भरधाव वेगाने इनोव्हा कार आली आणि तिने शासकीय दुचाकी (क्रमांक एम. एच. 15 बीएक्स 1241) ला धडक दिली.  यावेळी दुचाकीवरील कॉन्स्टेबल निकम तसेच होमगार्ड जवान रस्त्यावर खाली पडल्याने जखमी झाले. हे दोघे रस्त्यावर पडले असताना देखील त्यांना मदत न करता कार चालक ऋतिक जितेंद्र शिंदे हा तेथून पळून गेला. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार रेळे अधिक तपास करत आहेत.

Related Stories

मराठा आरक्षणासाठी चोराडे ग्रामस्थांची पालकमंत्र्यांच्याकडे धाव

Omkar B

निढळ ता खटाव येथील दोनजनांचा अपघाती मृत्यू

Patil_p

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात धोरणात्मक निर्णय – मंत्री शंभूराज देसाई

triratna

कांद्याचे दर उतरले

Patil_p

वसंतदादा कारखान्याकडून कोव्हिड रुग्णालयासाठी प्रस्ताव : विशाल पाटील

Patil_p

साताऱयात विभागाच्या बंगला परिसराला आग

Amit Kulkarni
error: Content is protected !!