तरुण भारत

शहरात पूरक पोषण आहाराचे 4 हजार 527 लाभार्थी

शहरात 60 अंगणवाडी : मुलांना घरपोच पोषण आहार

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोषण आहारापासून अंगणवाडी मधील एकही बालक, गर्भवती माता, स्तनदा माता वंचित राहू नये म्हणून सेविका हा पोषण आहार घरपोच देत आहेत. बाल विकास नागरी प्रकल्पामार्फत शहरात 60 अंगणवाडी आहेत. या अंगणवाडीतील चालु वर्षात मार्च व एप्रिल महिन्यामध्ये 2 हजार 527 लाभार्थी असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक ढेपे यांनी दिली.

      पोषण आहार हा अंगणवाडीत शिजवला जातो. मात्र कोरोनामुळे अंगणवाडी केंद्र बंद आहेत. यामुळे अंगणवाडी सेविका-मदतनीस किंवा बचत गटांच्या मार्फत लाभार्थ्याच्या घरोघरी जावून महिनाभराचा पोषण आहार वाटप करत आहेत. यामध्ये गहू, तांदूळ, कडधान्य, खाद्यतेल, गूळ, साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला यांचा समावेश आहे. काही दिवसापूर्वी साखरे ऐवजी तेल तर तेलाऐवजी साखर देण्यात येत होती. यामुळे लाभार्थ्यांना यांचा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर गावपातळीवर पोषण आहार घरपोच देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशीच कामे शहरातील अंगणवाडीमार्फत करण्यात येत आहेत.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास नागरी प्रकल्प शहरात राबविण्यात येत आहे. शहरी भागातील झोपडपट्टी व आर्थिक दुर्बल घटकातील भागामध्ये आहेत. सातारा शहरात एकून 60 अंगणवाडी आहेत. चालु वर्षी मार्च व एप्रिल महिन्यात 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील 2 हजार 205 लाभार्थी आहेत. 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील 1 हजार 751 लाभार्थी आहेत. गर्भवती व स्तनदा माता 565 आहेत. शालाबाह्य किशोरी 11 ते 14 वयोटातील 6 लाभार्थी आहेत.

शहर निहाय संख्या पुढील प्रमाणे

सातारा 60, कराड 25, फलटण 12, म्हसवड 14, रहिमतपुर 06, वाई 05, पाचगणी 02, आणि महाबळेश्वर 02 अशा 126 अंगणवाडी केंद्र आहेत.

Related Stories

बेरोजगारीची पायात बेडी; जमेना लग्नजोडी

triratna

उदयनराजेंकडून मोदी बेदखल

Amit Kulkarni

किमान दोन- चार मोठे उद्योग सातायात आणा- आ. शिवेंद्रसिंहराजे

Patil_p

कोरोना रूग्णांना आता घरीच ऑक्सीजन मिळणार

Patil_p

सातारा : दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

triratna

सातारा : कोट्यवधीची चांदी बोरगाव पोलिसांच्या ताब्यात

Shankar_P
error: Content is protected !!