तरुण भारत

शैक्षणिक फी साठी पालकांची अडवणूक करू नये-उदयनराजे

प्रतिनिधी / सातारा

ज्ञान हे दान करण्यासाठी वेचले जाते अशी भारतीय शिक्षणाची उत्कृष्ठ परंपरा आपल्याला लाभली आहे. सध्या कोरोनाचा काळ सर्वांनाच प्रतिकूल जात आहे. अश्या परिस्थितीत, खाजगी शाळा चालकांनी, हे ही दिवस लवकरच जातील याचा विचार करुन, केवळ शैक्षणिक फि किवा शैक्षणिक शुल्क दिले नाही म्हणून पाल्याची आणि पालकांची अडवणुक करु नये, पालकांनीही आपली परिस्थिती असेल तर ज्ञानदान करणा-यांना यथोचित सहकार्य करावे असे आवाहन करतानाच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी  जर का कोणी  शाळाचालक,या काळात पालकांची आणि पाल्यांची, शैक्षणिक शुल्काकरीता गळचेपी करीत असेल तर त्याची आम्ही वेळीच दखल घेवू असा इशारा एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे. 

Advertisements

खाजगी शाळांच्या फिस बाबत, पालकांनी उभारलेल्या सातारा जिल्हा पालक संघाच्या  चळवळीस आमचा पाठींबा आहे, असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, 

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांसह त्यांचे पाल्य यांच्या संयुक्त प्रयत्नांतुन खाजगी शाळा या आपले नांव उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्यामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणा-या शिक्षकांचा वाटा अनन्यसाधारण आहे. तथापि सध्याचा काळ हा अत्यंत खडतर आहे. माणुसकी संपवणारा हा कोरोना काळ शिक्षणाच्या संबंधीत सर्वांचीच परिक्षा पहाणारा आहे. त्यामुळे संस्था चालकांनी शिक्षकांना सर्वोच्य प्राधान्य देत संस्थेच्या व वेळप्रसंगी स्वतःच्या राखिव निधीमधुन, शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मानधन-पगार वेळचेवेळी करावेत. पालकांशी समन्वयातुन  आत्ताची परिस्थिती समजुन घेवून, पाल्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घ्यावा. सातारा जिल्हयात केवळ शैक्षणिक शुल्काकरीता पालकांना जोर जबरदस्ती, अपमानीत करणे, किंवा निकाल राखुन ठेवणे,पुढील वर्षाचा प्रवेश रखडवणे असले प्रकार होत असतील असे वाटत नाही. जर होत असतील तर ते त्वरीत बद करावेत.              केवळ शुल्क दिले नाही म्हणून पाल्यांचे शैक्षणिक नुकसान करणे कोणालाच मान्य होणार नाही. पालकांनीही आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेवून, त्यांनी आपल्या पाल्यांमध्ये पाहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी प्रामाणिकपणे शाळेशी चर्चा करुन, शाळेचीही आर्थिक गैरसोय होणार नाही अशी भुमिका घ्यावी अशी विनंती सूचना  आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक शुल्काकरीता आम्ही शैक्षणिक नुकसान होवू देणार नाही. याबाबत अशी प्रकरणे हाताळण्यासाठी जलमंदिर पॅलेस येथील जनसंपर्क कार्यालयात पालकांनी संपर्क साधावा योग्य तो तोडगा काढला जाईल असेही खासदार  श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमुद केले आहे.

Related Stories

पत्नीच्या डोक्यात दगड घालत आईलाही मारहाण

Amit Kulkarni

ध्वनिप्रदूषण आळा घातलाच पाहिजे

Patil_p

सातारा : कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी

Shankar_P

कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वतीने कमला देवी चरणी चांदीची तलवार अर्पण

triratna

सातारा : हॉटेल मालकासह हॉटेलमध्ये जेवणार्‍या सहा जणांवर गुन्हा

triratna

सेंद्रिय शेती खरेदी व विक्री जाहिरातीस तरुणांनी बळी पडू नये – कृषि आयुक्तालय

triratna
error: Content is protected !!