तरुण भारत

नायजेरियात ट्विटरची जागा घेणार ‘कू’

अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग साइटवर बंदी

वृत्तसंस्था / अबुजा

Advertisements

नायजेरियातील सरकारने अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग साइटवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर तेथील सरकारने ट्विटरची प्रतिस्पर्धी कंपनी भारताच्या ‘कू’सोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नायजेरियातही आम्ही उपलब्ध असून प्लॅटफॉर्मवर नायजेरियाच्या स्थानिक भाषेवर काम केले जात असल्याची घोषणा ‘कू’ कंपनीने केली आहे.

ट्विटरने नायजेरियाचे राष्ट्रपती मुहम्मद बुहारी यांचा एक ट्विट नियमाचा दाखला देत डिलीट केला होता, यानंतर ट्विटरवर बंदी घालण्यात आली होती. ट्विटरचा गैरवापर करत आणि खोटय़ा बातम्या फैलावून नायजेरियातील कंपन्यांना नुकसान पोहोचविले जात असल्याचा आरोप करत सरकारने बंदीचे पाऊल उचलले होते.

नायजेरियातही ट्विटरवरील बंदीला सर्वांचे समर्थन मिळत नसल्याचे चित्र आहे. काही जण याला अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन मानत आहे. नायजेरियातील बंदीवरून आम्ही चिंतित आहोत. मोफत आणि सर्वांसाठी उपलब्ध इंटरनेट आधुनिक समाजात एक महत्त्वाचा मानवी अधिकार असल्याचे ट्विटर कंपनीने म्हटले आहे.

‘कू’ला मिळणार बळ

नायजेरियात ट्विटरवर बंदी घालण्यात आल्यावर ‘कू’सोबत हातमिळवणी करण्याच्या निर्णयामुळे भारतीय कंपनीला बळ मिळणार आहे. ट्विटरचा पर्याय म्हणून उभे राहण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. भारतातही ‘कू’च्या उदयामागे केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील मतभेद कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. केंद्र सरकारने ट्विटरला अनेक ट्विट आणि अकौंट्स बेकायदेशीर ठरवत हटविण्यास सांगितले होते. पण ट्विटरने ही मागणी कधीच मान्य न केल्याने मतभेद वाढत चालले आहेत. ट्विटरने आतापर्यंत भारताच्या नव्या आयटी नियमांचेही पालन केलेले नाही.

Related Stories

इस्रायलसाठीची प्रवासबंदी बांगलादेशने हटविली

Patil_p

हेलिकॉप्टर अपघातात अलास्कामध्ये 5 ठार

Patil_p

भारताचे डब्ल्यूएचओकडून कौतुक

Patil_p

मोसाद प्रमुखपदी डेव्हिड बार्निया

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांपार

datta jadhav

भारताशी चर्चेकरिता अमेरिकेला विनवणी

Patil_p
error: Content is protected !!