तरुण भारत

देणगीप्रकरणी भाजप पुन्हा अग्रस्थानावर

2019-20 मध्ये भाजपला 750 कोटी रुपयांची देणगी प्राप्त : काँग्रेस पक्षापेक्षा 5 पट अधिक मोठा आकडा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

राजकीय पक्षांना कॉर्पोरेट आणि व्यक्तींकडून देणगी मिळविण्याप्रकरणी भाजप सलग 7 व्या वर्षी अव्वल राहिला आहे. 2019-20 मध्ये भाजपला 750 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. ही रक्कम काँग्रेसला मिळालेल्या देणगीच्या (139 कोटी रुपये) तुलनेत 5 पट अधिक आहे. तिसऱया स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस असून या पक्षाला 59 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

तर माकपला 19.6 कोटी, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 8 कोटी रुपये मिळाले होते. तर भाकपला 1.9 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. भाजपच्या प्रमुख देणगीदारांमध्ये भाजप खासदार राजीव चंद्रशेखर यांची ज्युपिटर कॅपिटल, आयटीसी ग्रूप, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, बीजी शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, द प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट आणि जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट यांचा प्रामुख्याने समावेश राहिला आहे.

इलेक्टोरल ट्रस्ट एक अशी कंपनी असते जिला राजकीय पक्षांमध्ये वितरित करण्यासाठी कॉर्पोरेट हाउसेसकडून निधी मिळतो. याच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी देणारे कॉर्पोरेट स्वतःची ओळख जाहीर न करता रक्कम देऊ शकतात. प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्टमध्ये भारती एंटरप्रायजेस, जीएमआर एअरपोर्ट डेव्हलपर्स आणि डीएलएफकडून प्रामुख्याने निधी मिळतो. जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टकडे जेएसडब्ल्यू समुहाच्या कंपन्यांकडून पैसा येतो.

भाजपला ऑक्टोबर 2019 मध्ये गुलमर्ग रिएलटर्सकडूनही 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. गुलमर्ग ही सुधाकर शेट्टी या बांधकाम व्यावसायिकाची कंपनी आहे. जानेवारी 2020 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने शेट्टी यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता.

शैक्षणिक संस्थांकडूनही देणगी

भाजपला देणगी देणाऱयांमध्ये 14 शैक्षणिक संस्थाही सामील आहेत. यात मेवाड विद्यापीठाने सर्वाधिक 2 कोटी रुपये दिले होते. तर एलर करियर कोटाने 25 लाख आणि कृष्णा इन्स्टीटय़ूट ऑफ इंजिनियरिंगकडून 10 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली होती. अशाचप्रकारे जीडी गोयंका इंटरनॅशनल स्कुल सूरत आणि पठानिया पब्लिक स्कुल रोहतककडून प्रत्येकी 2.5 लाख रुपये आणि लिटिल हार्ट कॉन्व्हेंट स्कुल, भिवानीकडून 21 हजार रुपये मिळाले होते.

भाजपचे प्रमुख देणगीदार

नावदेणगीची रक्कम
प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट217.75 कोटी
जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट45.95 कोटी
आयटीसी76 कोटी
लोढा डेव्हलपर्स21 कोटी
ज्युपिटर कॅपिटल15 कोटी

(देणगीची रक्कम रुपयांमध्ये असून आकडेवरी 2019-20 मधील आहे)

नेत्यांचाही हातभार

राजीव चंद्रशेखर2 कोटी रुपये
प्रेमा खांडू1.1 कोटी रुपये
किरण खेर6.8 लाख रुपये
मनोहरलाल खट्टर5 लाख रुपये

Related Stories

लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

pradnya p

मध्यप्रदेश : कोरोनाची लस मी आत्ताच घेणार नाही : शिवराज सिंह चौहान

pradnya p

राज्यात प्राप्तिकरचे 30 ठिकाणी छापे

Patil_p

बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 2.50 लाखांचा टप्पा

pradnya p

देशातील 18 राज्यांमध्ये कोरोनाचा ‘डबल म्यूटेंट’ प्रकार

datta jadhav

देशभर समान शिक्षणाची याचिका फेटाळली

Patil_p
error: Content is protected !!