तरुण भारत

मुस्लीम देशात भगवान विष्णूचा सर्वात मोठा पुतळा

हिंदू धर्मात भगवान विष्णू समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. शंकर, ब्रह्मा यांच्या त्रयीत भगवान विष्णूला पृथ्वीचा पालक मानले जाते. पूर्ण भारतात भगवान विष्णूची वेगवेगळय़ा नावांनी पूजा होत असते. पण जगात भगवान विष्णूचा सर्वात मोठा पुतळा भारतात नसल्याचे कळल्यावर आश्चर्य वाटेल. मुस्लिमांच्या लोकसंख्येप्रकरणी जगात पहिल्या स्थानावर असलेल्या देशात हा पुतळा आहे.

भगवान विष्णूचा हा पुतळा इंडोनेशियात असून तो सुमारे 122 फूट उंच आणि 64 फूट रुंदीचा आहे. या पुतळय़ाची निर्मिती तांबे आणि पितळय़ाच्या धातूचा वापर करत करण्यात आली आहे. या पुतळय़ाच्या निर्मितीकरता सुमारे 28 वर्षे लागली आहेत. हा पुतळा 2018 मध्ये पूर्ण झाला होता आणि जगभरातून लोक तो पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात.

Advertisements

1979 मध्ये इंडोनेशियातील मूर्तिकार बप्पा न्यूमन नुआर्ता यांनी हिंदू प्रतिकाचा विशाल पुतळा निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. हा पुतळा निर्माण करण्यासाठी 1980 च्या दशकात एक कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीच्या देखरेखीतच हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

दीर्घ नियोजन आणि निधी संकलनानंतर हा पुतळा उभारण्याचे कार्य 15 वर्षांनी म्हणजेच 1994 मध्ये सुरू झाले. या पुतळय़ाच्या उभारणीसाठी इंडोनेशियातील अनेक सरकारांनी मदत केली आहे.

मोठय़ा खर्चामुळे अनेकदा याचे काम रखडले, 2007 ते 2013 पर्यंत सुमारे 6 वर्षांपर्यंत याचे निर्मितीकार्य थांबले होते. पण त्यानंतर काम पुन्हा सुरू होत पुढील 5 वर्षांमध्ये पूर्ण झाले. गरुडावर आरुढ भगवान विष्णूचा हा पुतळा जगभरात असलेल्या हिंदू देवतांच्या पुतळय़ांमध्ये सर्वात उंच असल्याचे सांगण्यात येते. याच्यानंतर मलेशियातील भगवान मुरुगनच्या पुतळय़ाचा क्रमांक लागतो. मुरुगन देखील भगवान विष्णूचेच स्वरुप आहेत.

दक्षिण भारतात विशेषकरून तामिळनाडूत भगवान विष्णूची पुजा मुरुगन या नावाने केली जाते. इंडोनेशियात या विशाल पुतळय़ाची निर्मिती करणाऱया नुआर्ता यांनी भारतात सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

हे मंदिर तयार झाल्यावर सर्वप्रथम दर्शन करणारे इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो होते. या मंदिराची ख्याती आता जगभरात पसरली आहे. जगभरातील हिंदू भाविक येथे पोहोचतात.

Related Stories

‘ब्रेक्झिट’वर अखेर समझोता

Omkar B

कोरोना विरोधात रक्षा कवच ठरतोय ‘डेंग्यू’

Patil_p

लडाखमध्ये भारत-चीन सैन्यात तणाव वाढला

datta jadhav

चीनमध्ये आढळले ब्यूबॉनिक प्लेगचे रुग्ण

datta jadhav

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पावणेचार कोटींच्या उंबरठ्यावर

datta jadhav

इस्रायलला मान्यता देणार नाही : पाकिस्तान

Patil_p
error: Content is protected !!