तरुण भारत

नातं असहय़ झाल्यास त्यातून बाहेर पडावे!

बचना ए हसीनो फेम अभिनेत्री मिनीषा लांबा स्वतःच्या आयुष्यामुळे चर्चेत आहे. मिनीषाने विवाहाच्या 5 वर्षांनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पूजा बेदीचा चुलत बंधू रयान थामसोबत तिने घटस्फोट घेतला होता. घटस्फोटाचा निर्णय घेणे सोपे नव्हते असे तिने म्हटले आहे.

पूर्वी समाजात घटस्फोटाला चांगले मानले जात नव्हते. पण आता महिला निर्भर होत असल्याने स्वतःचे विचार उघडपणे मांडत आहेत. पूर्वी कुठलेही नाते टिकविण्याची जबाबदारी केवळ महिलांवर असायची. त्याच सर्व त्याग करायच्या. पण आता आनंदी नसल्यास नात्यातून बाहेर पडता येत असल्याचे त्यांना कळल्याचे मत मिनीषाने व्यक्त पेले आहे.

Advertisements

पाश्चिमात्य देशांमध्ये स्वयंप्रेमाची संकल्पना अधिक रुढ आहे. याचा अर्थ स्वार्थी असणे नाही. घटस्फोट सोपा नाही, पण नाते असहय़ झाल्यास त्यातून बाहेर पडणेच चांगले असते. विवाह आणि नातेसंबंध जीवनातील महत्त्वाचा हिस्सा असू शकतात. पण पूर्ण जीवन ठरू शकत नाही. महिलांना त्यांचे नातेसंबंध आणि वैवाहिक स्थितीमुळे ओळखले जाणे दुर्दैवी आहे. पण आता काळ बदलतोय असे तिने म्हटले आहे. बॉलिवूडमध्ये मिनिषा स्वतःची विशेष ओळख निर्माण करू शकली नाहीत. काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर तिने इंडस्ट्रीतून बेक घेतला होता. टीव्हीजगतातही तिने स्वतःचे नशीब आजमावले होते, पण तिथेही तिला फारसे यश मिळाले नव्हते. मिनिषाने बिग बॉस, तेनाली रमन, इंटरनेटवाला लव्ह यासारख्या शोंमध्ये काम केले आहे

Related Stories

रिलायन्स एंटरटेनमेंट ग्रुपच्या सीईओंना कोरोनाची बाधा

pradnya p

सुशांत आत्महत्या : CBI कडून रिया चक्रवर्तीची 10 तास चौकशी

pradnya p

ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

pradnya p

बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची बाधा

pradnya p

‘भेडिया’त दिसणार वरुण-कृतीची जोडी

Patil_p

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा : अभिनेते धर्मेंद्र

pradnya p
error: Content is protected !!