तरुण भारत

हास्यवायूने दूर होणार नैराश्य

नैराश्य दूर करण्याची नवी पद्धत

शिकागो विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी नैराश्य दूर करण्याची नवी पद्धत सांगितली आहे. दोन आठवडय़ांपर्यंत नाइट्रस ऑक्साइड म्हणजेच लाफिंग गॅसचा वास घेतल्यावर नैराश्याच्या लक्षणांमध्ये घट आणली जाऊ शकते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ही पद्धत अँटी-डिप्रेसेंट औषधांचा प्रभाव न होणाऱया नैराश्यग्रस्तांवरही प्रभावी असल्याचे सांगण्यात आले.

Advertisements

तातडीच्या स्थितीत वापर

वैज्ञानिकांनुसार रुग्णांना 25 टक्के लाफिंग म्हणजेच हसविणाऱया गॅसचा वास घेण्यास लावण्यात आला. या गॅसचे किरकोळ साइड इफेक्ट्स दिसून आले, पण उपचाराचा परिणाम अपेक्षेपेक्षा दीर्घकाळापर्यंत दिसून आला. लाफिंग गॅसचा वापर तत्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांवरही केला जाऊ शकतो.

25 टक्के प्रमाण अधिक प्रभावी

संशोधनात सामील 24 रुग्णांना एक तासापर्यंत गॅसचा गंध घ्यायला लावला. यादम्यान नाइट्रस गॅसची पातळी 25 आणि 50 टक्के दोन्ही ठेवण्यात आली. निष्कर्षात 50 टक्के नाइट्रस ऑक्साइच्या तुलनेत 25 टक्sक कन्सनट्रेशनयुक्त गॅस अधिक प्रभावी दिसून आला. तसेच साइड इफेक्टमध्येही घट झाल्याचे संशोधक आणि ऍनेस्थिसियोलॉजिस्ट पीटर नागेले यांनी सांगितले आहे. लाफिंग गॅसचा वापर सर्वसाधारणपणे ऍनेस्थीसिया देण्यासह ओरल प्रॉब्लेम आणि शस्त्रक्रियेवेळी वेदनेपासून दिलासा देण्यासाठी केला जातो.

अँटी-डिप्रेसेंटचा प्रभाव नाही

नैराश्याच्या सुमारे 15 टक्के रुग्णांमध्ये अँटी-डिप्रेसेंट औषधे काम करत नाहीत. ही औषधे का उपयुक्त ठरत नाहीत, हे अद्याप समोर आलेले नाही. यामुळे रुग्ण कित्येक वर्षांपर्यंत नैराश्याने ग्रस्त राहतात. पण उपचाराची नवी पद्धत नैराश्य दूर करण्यासाठी पर्याय ठरणार असल्याचे उद्गार संशोधक चार्ल्स कॉनवे यांनी काढले आहेत.

Related Stories

सौदी अरेबियाकडून येमेनमध्ये बॉम्बवर्षाव

Patil_p

कोरोना संसर्ग : फुफ्फुस अन् हृदय 3 महिन्यात आपोआप

Patil_p

चीनच्या चार कंपन्यांकडून होणारी आयात अमेरिकेने रोखली

datta jadhav

हिंदूंवर हल्ला करू पाहणारा बांगलादेशी दहशतवादी जेरबंद

Omkar B

युक्रेन विमानाप्रकरणी पहिली कारवाई

Patil_p

चीनमध्ये तब्बल 35 कोटी सीसीटीव्ही

datta jadhav
error: Content is protected !!