तरुण भारत

रशियन वैज्ञानिक बौद्ध भिक्षूंच्या शरणात

बौद्ध भिक्षू सांगणार अंतराळातील सुखद प्रवासाच्या पद्धती ध्यान, गाढ झोप सारख्या तंत्रज्ञानाने शरीराचे कमी नुकसान होणार

रशियाचे अंतराळ वैज्ञानिक सध्या तिबेटी बौद्ध भिक्षूंच्या शरणात आहेत. पण मानसिक शांततेसाठी नव्हे तर अनेक आठवडय़ांपर्यंत अर्ध सुप्तावस्थेत कसे राहतात, ध्यानाची स्थिती कशी घेतात आणि परत सामान्य स्थितीत कसे येतात हे जाणून घेण्यासाठी ते पोहोचले आहेत. या प्राचीन पद्धतींचे ज्ञान भविष्यात दीर्घ अंतराच्या अंतराळ मोहिमांमध्ये हे उपयुक्त ठरणार आहे.

Advertisements

मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक 100 तिबेटी भिक्षूंवर हे अध्ययन करत आहेत. दीर्घ अंतराच्या अंतराळत मोहिमेचे प्रमुख आणि मार्स-500 मोहिमेचे नेतृत्व करणारे प्राध्यापक युरी बबयेव यांच्यानुसार भिक्षंtकडून बाळगण्यात येणाऱया शीतनिद्रेची स्थिती मंगळमोहिमेदरम्यान महत्त्वपूर्ण ठरू शकते.

बबयेव यांची टीमा विशेषकरून टुकडम (मरणोत्तर ध्यान) यासारख्या दाव्यांवर अध्ययन करत आहे. यात भिक्षूंना वैद्यकीय स्वरुपात मृत घोषित केले जाते. तरीही कित्येक आठवडय़ांपर्यंत कुठल्याही हानीशिवाय ते सरळ बसून राहतात. म्हणजेच अनेक दिवसांनंतरही त्याच्या शरीरात मृतासारखी कुठलीच दुर्गंधी किंवा अन्य लक्षणे दिसून येत नाहीत.

याचबरोबर चेतनेच्या बदललेल्या स्थितींचा वापर करत मेटाबॉलिज्मचा वेग बदलला जाऊ शकतो. या स्थितींना अनेक तासांचे ध्यान, एकांत आणि मंत्रोच्चाराच्या मदतीने प्राप्त केले जाऊ शकते. दलाई लामा यांच्या अनुमतीनंतरच अध्ययन सुरू करण्यात आल्याची माहिती प्रा. बबयेव यांनी दिली आहे. शरीराला अधिक नुकसान न पोहोचविता अंतराळात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास या पद्धती मदत करतील. ध्यानाच्या स्थितीत भिक्षूंच्या मेंदूत कशाप्रकारच्या विद्युत हालचाली होतात हे देखील वैज्ञानिकांचे पथक तपासत आहे. ध्यानामुळे मेंदू बाहेरील हालचालींपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. टीम सध्या नासासोबत मिळून स्पेस फ्लाइटदरम्यान ‘गाढ झोप’च्या पर्यायावर संशोधन करत आहे.

Related Stories

डेन्मार्कमध्ये मिळाली 3000 वर्षे जुनी कांस्य तलवार

Amit Kulkarni

हे केवळ ट्रम्पच करू शकतात!

Patil_p

चीनविरोधात 27 देशांकडून तक्रार याचिका दाखल

datta jadhav

90 लाख चाचण्या 5 दिवसात

Omkar B

पाकिस्तान हिंसाचाराच्या विळख्यात

Patil_p

भारत संयुक्त राष्ट्र परिषदेचा अस्थायी सदस्य; 184 देशांनी दिला पाठिंबा

pradnya p
error: Content is protected !!