तरुण भारत

द्रौपदीच्या भूमिकेत रिया चक्रवर्ती?

वादग्रस्त अभिनेत्री रिया चक्रवर्तीला महाभारतावर आधारित एका मोठय़ा चित्रपटातील भूमिकेचा प्रस्ताव मिळाला असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट महाभारत आणि द्रौपदीच्या व्यक्तिरेखेवर आधारित असणार आहे. यातील द्रौपदीच्या भूमिकेचा प्रस्ताव रियाला देण्यात आल्याचे समजते. रियाने अद्याप या भूमिकेसाठी होकार दर्शविलेला नाही.

मागील वर्षी रिया चक्रवर्तीला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न तिने चालविला आहे. ती अनेक दिग्दर्शकांकडे काम मागत आहे. मागील काही महिन्यांपासून रिया सोशल मीडियावर सक्रीय दिसून येत आहे.

Advertisements

बॉलिवूड अभिनेत्रीने अमली पदार्थांप्रकरणी तुरुंगवास भोगला आहे. ग्लॅमर आणि लाइमलाइटपासून दूर रिया स्वतःला वेळ देत नव्याने जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.

तुरुंगातून बाहेर पडल्यावर रियाने धार्मिक पोस्ट्स शेअर करण्यास प्रारंभ केला आहे. पण चाहते अद्याप सुशांत सिंग राजपूतच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर पडलेले नाहीत. याचमुळे ते रियाच्या या बदललेल्या स्वरुपालाही पसंत करत नसल्याचे दिसून येते. रियाच्या पोस्ट्सवर ट्रोल केले जात आहे.

Related Stories

सायनावरील बायोपिक 26 मार्चला झळकणार

Patil_p

अभिनेता आफताब शिवदासानी कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

पहिला लष्करी ऍक्शन मराठी चित्रपट लवकरच भेटीला

Patil_p

मेरे देश की धरतीमध्ये दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत

Patil_p

लग्नाच्या गुंतागुंतीची गोष्ट ‘द वेडिंग इयर’

Patil_p

‘बिंडा’चे पोस्टर प्रकाशित

prashant_c
error: Content is protected !!