तरुण भारत

यामाहाची एफझेड-एक्स 18 जूनला लाँच

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी यामाहाची नवी एफझेड-एक्स ही दुचाकी येत्या 18 जूनला बाजारात दाखल होणार आहे. लाँचिंगची तारीख कंपनीने घोषित केली असून यासाठी निमंत्रणेही पाठवून देण्याचे कार्य सुरू झाले आहे. गाडीला समोर एलइडी प्रोजेक्टर हेडलॅम्प असून 149 सीसी, सिंगल सिलेंडर एयर कुल्ड इंजिनची जोड असणार आहे. या गाडीत स्मार्टफोन ब्लटुथ कनेक्टीव्हीटीची सुविधा असेल. आधीच्या दाखल झालेल्या एफझेडएस- एफआयच्या तुलनेत लांबी 30 एमएम, उंची 5 एमएम आणि रुंदी 35 एमएम अधिक असणार आहे. सदरच्या नव्या गाडीची किंमत 1 लाख 8 हजार रुपये इतकी असेल, असेही सांगितले जात आहे.

Related Stories

मर्सिडीज बेंझ इंडियाच्या कार विक्रीत 34 टक्क्यांनी वाढ

Amit Kulkarni

महिंद्राची नवी ‘थार’ बाजारात

Patil_p

चेतकचे बुकिंग 24 शहरात करता येणार

Patil_p

हिरोमोटोची नवी मास्टरो एज 110 बाजारात

Patil_p

रेनॉची नवी क्वीड बाजारात

Patil_p

हिरो मोटोकॉर्पची बीएस 6 स्प्लेंडर प्लस महागली

Patil_p
error: Content is protected !!