तरुण भारत

टाटा डिजिटल ऑनलाईन औषध विक्रीत उतरण्याचे संकेत

 वृत्तसंस्था / नवी दिल्ली

टाटा समूहातील सबसिडियरी टाटा डिजिटल आता ऑनलाईन फार्मसी सेगमेंटमध्ये उतरण्याची तयारी करत आहे. टाटा डिजिटलने सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन फार्मसी कंपनी ‘1 एमजी टेक्नॉलॉजी लिमिटेड’ मधील मोठी हिस्सेदारी खरेदी करणार आहे. बिग बास्केटनंतर टाटा डिजिटल आता डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी दुसऱया महत्वपूर्ण स्टार्टअपचे अधिग्रहण करणार आहे.

Advertisements

टाटा डिजिटलने चालू आठवडय़ाच्या सुरुवातीलाच फिटनेस स्टार्टअप क्योरफिट हेल्थकेअरमध्ये 550 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. या व्यवहारांतर्गत क्योरफिटचे सहसंस्थापक मुकेश बन्सल टाटा डिजिटलचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

टाटा समूह ई-कॉमर्स सेगमेंटमध्ये दमदारपणे उतरत असून यामध्ये सुपरऍप आणण्याची योजना तयार केली आहे. सदरच्या अधिग्रहणामुळे आणि गुंतवणुकीमुळे टाटा समूह सुपरऍपला मजबूत स्थिती प्राप्त होणार असल्याचेही सांगितले जात आहे. ‘1एमजी’चे अधिग्रहण टाटा समूहाकरीता महत्त्वाचे मानले जात आहे. कारण रिलायन्स इंडस्ट्रीजने ऑनलाईन फार्मसी सेगमेंटमध्ये पाय ठेवत नेटमेड्सचे अधिग्रहण केले आहे. ई कॉमर्स क्षेत्रात टाटा समूहाची टक्कर ही प्रामुख्याने फ्लिपकार्ट, ऍमेझॉन आणि रिलायन्स रिटेल या दिग्गज कंपन्यांसोबत असेल.

Related Stories

कायम स्वरुपी घरातून काम आरोग्यास धोकादायक?

Patil_p

दुसऱया लाटेचा सामना करण्यासाठी उद्योग क्षेत्र तयार

Patil_p

देशातील 26 राज्यांच्या जीएसटी उत्पन्नात नोंदवली घसरण

Patil_p

आयात कोळसा वीज प्रकल्पांना पुरविणार

Patil_p

सेन्सेक्सचा निर्देशांक 50 हजारावर पोहचणार : मॉर्गन स्टॅनलेचा अंदाज

Patil_p

आर्म होल्डिंग्स कंपनीची निविडिया खरेदी करणार

Patil_p
error: Content is protected !!