तरुण भारत

प्रंटलाईन कामगारांसाठी इंडियन ऑईलचा पुढाकार

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे जीवनातील प्रत्येक क्षण आज प्रभावीत होत गेला आहे. परंतु या संकटाच्या काळातही काम करणाऱया कामगारांची जबाबदारी काही कंपन्या पुढे येऊन घेत आहेत. यामध्ये आपल्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचविणारे आणि पेट्रोलपंपावर काम करणारे जे कामगार आहेत, त्यांचा समावेश प्रंटलाईन कामगारांमध्ये करण्यात आला आहे.

देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल इंधनाचा पुरवठा  करणार असल्याचे निश्चित केले आहे. परंतु या संकटाच्या काळात सेवा देणाऱया कामगारांची सुरक्षा लक्षात घेत त्यांच्यासाठी इंडियन ऑईल लसीकरणाची मोहीम चालविणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

उत्तर विभागीय कार्यालयातील दिल्ली-एनसीआरमधील एलपीजी बॉटलिंग प्रकल्प, पीओएल ठिकाणं, एव्हिएशन फ्यूल स्टेशन, रिटेल आउटलेट, एलपीजी डिस्ट्रीब्यूटरशिप या सारख्या ग्राहकांशी संपर्क येणाऱया ठिकाणी लसीकरणाचे शिबिर आयोजित केले जाणार आहे.

Related Stories

सेबीची दोन कंपन्यांना आयपीओसाठी मंजुरी

Patil_p

कृषी अर्थव्यवस्थेच्या मर्यादा

Omkar B

पडझडीचा काळ; पण…

Omkar B

लॅपटॉप बाजारावर ‘ऍपल’ची नजर

Patil_p

मारुतीची कार विकत घेणे अधिक सोपे

Patil_p

स्टेट बँकेचा नफा 80 टक्क्यांनी वधारला

Patil_p
error: Content is protected !!