तरुण भारत

‘यु ऍण्ड आय’कडून फ्लेम ब्लुटुथ स्पीकर लाँच

 वृत्तसंस्था / नवी दिल्ली

गॅजेट्स आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन बनविणारी कंपनी युऍण्डआय यांनी भारतीय बाजारात नव्या फ्लेम ब्लुटुथ स्पीकरचे लाँचिंग केले आहे. वजनाला हलके असणारे हे  उत्पादन सादर केले आहे. सदरच्या स्पीकरमध्ये अत्याधुनिक फिचर्सची सेवा दिली आहे. फ्लेम ब्लुटुथ स्पीकरमध्ये पाच वॅटचे स्पीकर दिले आहेत. जे पार्टी किंवा इनडोअर आउटडोरसाठी वापरता येणार आहेत. याची जोडणी ही वायरलेस जोडणीसोबत उपलब्ध होणार आहे. टीडब्लूएस फिचर असणाऱया या स्पीकरला कनेक्ट करता येणार आहे. 1200 एमएएच क्षमतेची बॅटरी राहणार असून दोन तासाच्या पूर्ण चार्जनंतर नॉनस्टॉप चार तासांपर्यंत म्युझिक ऐकण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या उपकरणाची किमत ही 1499 रुपये राहणार आहे.

Advertisements

Related Stories

नोकियाचे दोन नवे फोन बाजारात

Patil_p

शाओमीचा 200 मेगापिक्सल कॅमेराचा स्मार्टफोन लवकरच

Patil_p

शाओमी ब्रँडच्या स्मार्टफोन्सना सर्वाधिक पसंती

Patil_p

इनफिनीक्स नोट 10, नोट 10 प्रो बाजारात

Patil_p

‘iPhone 11’चे भारतात उत्पादन सुरू

datta jadhav

मोटो जी 9 पॉवर आज होणार दाखल

Patil_p
error: Content is protected !!