तरुण भारत

चार वर्षात युपीआय व्यवहार 1200 पटीने वाढले

 2020-21 मध्ये 41 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण

 वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

कोरोना कालावधीत डिजिटल व्यवहारांना मोठय़ा प्रमाणात चालना मिळाली असल्याचे पहावयास मिळाले आहे. याचा परिणाम म्हणून वर्ष 2020-21 मध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) याच्याआधारे 2233 कोटी व्यवहार करण्यात आले आहेत. सदरच्या व्यवहारांच्या मदतीने एकूण 41 कोटी रुपयांची देवाणघेवाण करण्यात आली आहे.

भारतामध्ये युपीआयची सुरुवात 2016 मध्ये झाली होती. पहिल्या वर्षात म्हणजे 2016-17 मध्ये एकूण 1.8 कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत. त्याच वर्षात या व्यवहारांच्या आधारे 0.7 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली. मागील चार वर्षामध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये जवळपास 1200 पटीने वाढ झाली असली तरी या देवाणघेवाणीतून झालेल्या व्यवहारांची संख्या ही 50 पटीने अधिक आहे.

काय आहे युपीआय सेवा ?

युनिफाइड पेमेंटस् इंटरफेस अर्थात युपीआय ही सेवा भारतामध्ये ई पेमेंटसाठी पैशाच्या देवाणघेवाणीसाठी वापरली जाते. अंतरबँकिंग व्यवहारासाठी नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही सेवा विकसित केली आहे. या सेवेच्या आधारे स्मार्टफोनच्या सहाय्याने पैशाच्या देवाणघेवाणीचे ऑनलाइन व्यवहार बँक खात्यातून करता येतात.

युपीआयशी संबंधीत बाबी

  • -युपीआयवर थेटपणे पैसे दुसऱयाला तातडीने ऑनलाइन पाठवता येतात.
  • -कोणालाही पैसे पाठविताना फक्त युपीआय आयडी, ईमेल, मोबाईल नंबर, आधार नंबर याची आवश्यकता असते.
  • -भाडे, मोबाईल रिचार्ज आणि आवश्यक बिले ऑनलाइन भरण्याची सोय या माध्यमामार्फत होते.
  • रेस्टॉरंट, किराणा दुकाने व इतर स्टोअर्समध्ये रक्कम युपीआयच्या माध्यमातून भरता येते.

Related Stories

‘पेटीएम’चा 22 हजार कोटींचा आयपीओ लवकरच

Amit Kulkarni

आता गरज भक्कम आधाराची !

Omkar B

इपीएफओची मल्टी लोकेशन क्लेम सुविधा

Patil_p

बाजारातील सलगच्या घसरणीला अखेर विराम !

Patil_p

कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात

Patil_p

दुचाकी वाहन विक्रीवर कोरोनाचा प्रभाव?

Patil_p
error: Content is protected !!