तरुण भारत

अदानींची 29 हजार कोटींच्या आयपीओसाठी मोठी योजना

 वृत्तसंस्था / मुंबई

आशियातील दुसरे आणि जगातील 14 वे सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिक गौतम अदानी हे पुन्हा एकदा चर्चेत राहिले आहेत. त्यांनी यावेळी मोठी योजना आखली असून याअंतर्गत आपल्या अदानी एअरपोर्टला शेअर बाजारात लिस्ट करणार असल्याचे समजते. याच्या आधारे जवळपास 25 ते 29 हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

अदानी समूहाच्या एकूण सहा कंपन्या लिस्टेड झाल्या आहेत. तसेच त्यांचे बाजारमूल्य हे 8.50 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे बाजारमूल्य 1.93 लाख कोटी आहे. मागील आठवडय़ात ते 2 लाख कोटी रुपये होते.

भारताचे इन्फ्रा किंग म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या तयारीत अदानी आहेत. त्यांच्या जास्तीत जास्त कंपन्या याच क्षेत्रात काम करत आहेत. यांच्या कोळसा व्यवसाय, बंदर आणि पॉवर प्लांटमधील कंपन्या मजबूत व्यवसाय करत आहेत.

2019 मध्ये एअरपोर्ट व्यवसायात वर्ष 2019 मध्ये अदानी एअरपोर्टने विमानतळ व्यवसायामध्ये प्रवेश केला होता.  देशातील एकूण 6 एअरपोर्ट 50 वर्षांसाठी विकासासाठी घेतली आहेत. यात लखनऊ, मंगळुरु, जयपूर, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि अहमदाबाद एअरपोर्टचा समावेश होता.

Related Stories

जगातील श्रीमंताच्या यादीमधून मुकेश अंबानी बाहेर

tarunbharat

आघाडीवरच्या 6 कंपन्यांचे भांडवल 69 हजार कोटींनी वाढले

Patil_p

स्मार्टफोन शिपमेंट 16 कोटींपेक्षा कमीच राहणार?

Amit Kulkarni

अलिबाबाने गुंडाळला भारतामधील व्यापार

Patil_p

जपानच्या अकात्सुकीचा भारतात प्रवेश ?

Patil_p

व्याज सवलतीची मुदत वाढवली

Patil_p
error: Content is protected !!