तरुण भारत

योगी आदित्यनाथ पक्षश्रेष्ठींच्या भेटीला

अमित शहा यांच्याशी चर्चा : आज पंतप्रधान मोदींनाही भेटणार : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे दोन दिवसांच्या दौऱयावर आले असून गुरुवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. अनेक राजकीय मुद्दय़ांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. शुक्रवारी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये येत्या मार्चमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

बुधवारी काँगेसचे युवा नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या घटनेची पार्श्वभूमीही आदित्यनाथ यांच्या दौऱयाला असल्याचे बोलले जाते. तसेच भाजपचा मित्रपक्ष असणाऱया अपना दल या पक्षाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनीही गुरुवारी संधकाळी 5 वाजता अमित शहा यांची भेट घेतली.

बैठकांचे सत्र

दिल्ली दौरा सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश भाजप शाखेचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग यांच्याशी चर्चा केली. नंतर त्यांनी भाजपचे उत्तर प्रदेश संघटन प्रभारी सुनिल बन्सल यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या सर्व बैठकांमध्ये काय चर्चा झाली, याचा अहवाल देण्यासाठी योगी आदित्यनाथ दिल्लीस आले आहेत.

अफवांचा सुकाळ

उत्तर प्रदेशात आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाविरोधात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे, असे बोलले जात आहे. कोरोना परिस्थिती त्यांनी व्यवस्थित हाताळली नाही, अशीही चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी त्यांना बदलून नव्या नेत्याकडे मुख्यमंत्रीपद दिले जाईल, अशीही हवा होती. तथापि, या सर्व अफवा आहेत, असा खुलासा उत्तर प्रदेश भाजपकडून करण्यात आला आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱयाला या चर्चांचीही पार्श्वभूमी आहे.

Related Stories

पाकिस्तानी घुसखोराचा राजस्थानमध्ये खात्मा

Patil_p

मंगळवारी 6,777 रुग्ण कोरोनामुक्त

Patil_p

स्वनातीत स्मार्ट क्षेपणास्त्राचे परीक्षण

Patil_p

तळीरामांना मिळणार घरबसल्या दारु

triratna

भाजप खासदाराच्या विरोधात तृणमूलचे पोस्टरवॉर

Patil_p

कोणत्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे; भारताची पाकिस्तानकडे मागणी

pradnya p
error: Content is protected !!