तरुण भारत

बिहारच्या लपवा-छपवीने मृत्यूसंख्येचा विस्फोट

देशात एका दिवसातील सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद : बाधितांच्या संख्येतही किंचित वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात कोरोनाची लाट ओसरत असतानाच गुरुवारी चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी झालेल्या मृत्यूंची संख्या 6 हजारच्या वर पोहोचल्याने ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या ठरली आहे. दिवसभरातील एकंदर 6,148 मृतांमध्ये बिहार राज्यातील 3,971 जणांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. मृतांच्या संख्येने विक्रमी पातळी गाठली असली तरी देशातील बाधितांच्या संख्येत मंगळवारच्या तुलनेत किंचित वाढ झालेली दिसून येत आहे. दरम्यान, बिहारमधील मृतांच्या आकडेवारीवरून राजकारण तापले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या बुधवारी एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 6,148 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा 3 लाख 59 हजार 676 झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र, गेल्या काही दिवसात बिहार राज्यात लपवण्यात आलेली आकडेवारी जाहीर करण्यात आल्याने मृतांच्या आकडय़ाने सहा हजारच्या वर झेप घेतली. देशातला मृत्यूदर आता 1.23 टक्क्मयांवर पोहोचला आहे.

देशात कोरोनाच्या नव्या बाधितांचा आकडा सलग तिसऱया दिवशी एक लाखांच्या खाली राहिला आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजे बुधवारी 94 हजार 52 नव्या बाधितांची नोंद झाली. याच कालावधीत देशात 1 लाख 51 हजार 367 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 2 कोटी 91 लाख 83 हजार 121 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी 2 कोटी 76 लाख 55 हजार 493 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अजूनही देशात 11 लाख 67 हजार 952 इतके सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

बिहारच्या आकडेवारीवरून राजकीय घमासान दुसऱया लाटेत बिहार सरकारने मृतांचे आकडे लपल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर पटना उच्च न्यायालयानेही मृतांच्या आकडेवारीवरून सरकारला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आता बिहार सरकारनेच मृतांच्या आकडेवारीत तफावत असल्याची कबुली दिली. आरोग्य विभागातील अप्पर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी पत्रकार परिषद घेत सुधारित आकडेवारी जाहीर केली. नव्या आकडेवारीनुसार मृतांचा आकडा 73 टक्क्मयांनी वाढला आहे. या स्पष्टीकरणानंतर विरोधकांनी बिहार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता आकडेवारीत तफावत आढळल्यानंतर सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

देशातील कोरोनास्थिती…

  • दिवसभरातील नवे रुग्ण : 94,052
  • दिवसभरातील डिस्चार्ज :1.51 लाख
  • दिवसभरातील मृत्यूसंख्या : 6,148
  • आतापर्यंतचे एकूण बाधित : 2.91 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 2.76 कोटी
  • देशातील आतापर्यंतचे मृत्यू : 3.59 लाख
  • देशातील सक्रिय रुग्णसंख्या : 11.67 लाख

Related Stories

देशात 61 हजार 537 नवे रुग्ण

Patil_p

महाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मीरमध्ये वीरमरण

Patil_p

भारताकडून मालदीवला 25 कोटी अमेरिकन डॉलर्सची मदत

datta jadhav

आलमट्टी भरण्याच्या मार्गावर

Patil_p

रॉबर्ट वाड्रा पॉझिटिव्ह, प्रियंका ‘क्वारंटाईन’

Patil_p

बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 2.50 लाखांचा टप्पा

pradnya p
error: Content is protected !!