तरुण भारत

ऑनलाईन नोंदणीशिवाय व्हावे लसीकरण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी : इंटरनेट नसणाऱयांनाही जगण्याचा अधिकार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी कोरोना लसीच्या मुद्दय़ावरून सरकार आाणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. लस घेण्यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करविण्याच्या अनिवार्यतेच्या व्यवस्थेवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. कोरोना लसीकरण केंद्रावर जाणाऱया प्रत्येक व्यक्तीला लस देण्यात यावी. याकरता ऑनलाईन नोंदणीच पुरेशी नाही. इंटरनेट नसलेल्यांनाही जगण्याचा अधिकार असल्याचे राहुल यांनी स्वतःच्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

राहुल गांधी यांनी अलिकडेच लसीकरणासाठी राज्यांना मोफत लसी उपलब्ध करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतरही प्रश्न उपस्थित केला होता. सर्व लसी मोफत आहेत, मग खासगी रुग्णालयांनी पैसे का आकारावेत असा सवाल त्यांनी केला होता. राहुल यांच्या या ट्विटची सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात खिल्ली उडविण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांना 21 जूनपासून मोफत लसी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सोमवारी म्हटले होते. आगामी दिवसांमध्ये लसीच्या पुरवठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. एकूण लसींपैकी 75 टक्के लसींची खरेदी केंद्र सरकार करणार आणि 25 टक्के लसी अद्याप खासगी रुग्णालयांना मिळणार आहेत. पण खासगी रुग्णालये प्रति डोस 150 रुपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क आकारू शकणार नाहीत असे मोदींनी स्पष्ट केले होते.

Related Stories

जमशेदपूर एफसी संघाच्या प्रमुखपदी कॉयली

Patil_p

हिमाचल प्रदेश : दरीत कोसळली एचआरटीसी बस; 6 जण गंभीर जखमी

pradnya p

आंदोलक शेतकऱयांशी चर्चा अपूर्ण

Patil_p

ऑगस्टपर्यंत प्रतिदिन 1 कोटी लसी शक्य

Amit Kulkarni

मध्य प्रदेश : ‘या’ शहरात मास्क न घातल्यास जावे लागणार थेट तुरुंगात

pradnya p

चीनला भारताचा पुन्हा एक झटका

Patil_p
error: Content is protected !!