तरुण भारत

बेल्जियम-रशिया यांच्यात युरो सलामीची लढत आज

वृत्तसंस्था / सेंट पीटर्सबर्ग

2021 युरोपियन चषक फुटबॉल स्पर्धेत फिफा मानांकनात जवळपास दीड वर्षे आपले अग्रस्थान राखणाऱया बेल्जियकमडे रशियावर मात करण्याची निश्चितच क्षमता आहे. येत्या शनिवारी युरो चषक फुटबॉल स्पर्धेत टॉप सिडेड बेल्जियमचा ब गटातील सलामीचा सामना रशियाबरोबर होणार आहे.

Advertisements

जागतिक फुटबॉल क्षेत्रामध्ये बेल्जियम संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत आपला दर्जा सिद्ध केला आहे. बऱयाच कालावधीनंतर बेल्जियम संघाला प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले वर्चस्व राखण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही दिवसामध्ये बेल्जियम संघाला अनेक दुखापतग्रस्त फुटबॉलपटूंची समस्या चांगलीच भेडसावत आहे. बेल्जियम संघातील केव्हिन डी ब्रुईन आणि विटसेल हे दुखापतीतून अद्याप पूर्ण बरे झाले नसल्याने ते युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील येत्या शनिवारी होणाऱया रशियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या महिन्यात डी ब्रुईनला दोनवेळा दुखापत झाली होती. चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळताना ब्रुईन जखमी झाला होता. बेल्जियम संघातील हॅजार्ड अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.

प्रमुख तीन खेळाडूंच्या गैरहजेरीत बेल्जियम संघाला शनिवारच्या सामन्यात रशियाविरुद्ध लढत द्यावी लागेल. रशियन संघाला कमी लेखून चालणार नाही. सेंट पीटसबर्गमध्ये बेल्जियम संघाचा यापूर्वीचा शेवटचा सामना 2019 नोव्हेंबरमध्ये झाला होता. आणि बेल्जियमने यजमान रशियावर 4-1 अशा गोलफरकाने मोठा विजय मिळविला होता. युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्र फेरीच्या गुणतत्क्यात ब गटात रशिया सहा गुणासह दुसऱया स्थानावर आहे. शनिवारच्या सामन्यात रशिया संघाकडून गोलरक्षक ऍकीनफेव खेळणार नाही.

Related Stories

डेन्मार्कचे मॉल्डोव्हावर 8 गोल

Patil_p

गंभीर म्हणाला, कर्णधाराने प्रथम स्वतः लढावे!

tarunbharat

तंदुरुस्त कपिलचे गोल्फ कोर्सवर पुनरागमन

Patil_p

सायकलींग सराव शिबिराला दिल्लीत प्रारंभ

Patil_p

रिअल माद्रिदचे प्रशिक्षक झिदान कोरोनाबाधित

Patil_p

माद्रिद ओपनमधून जोकोविचची माघार

Patil_p
error: Content is protected !!