तरुण भारत

अजित पवारांकडून पोलीस मुख्यालयाची पाहणी, कामाच्या दर्जावरून ठेकेदाराची कानउघडणी

ऑनलाईन टीम / पुणे : 


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार शुक्रवारी सकाळीच पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी  पोलीस मुख्यालयातील ब्रिटिशकालीन वास्तूचे नुतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी केली. यावेळी सदोष काम करण्यात आले असल्याचे अजित पवारांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच संबंधित ठेकेदाराला बोलवण्यास सांगितले आणि केलेल्या कामावरून कानउघाडणी केली.

Advertisements


पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या बांधकामावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांदेखत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडे बोल सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस मुख्यालयाचे काम अगदी छा-छू झाले आहे. ही पोलिसांची अवस्था असेल तर बाकीच्या कामांचे  काय, असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. चांगले काम बघण्यासाठी मला बोलवा, असे म्हणत कामाच्या दर्जावर पवार संतापले. 


या सगळ्या प्रकारानंतर अधिकाऱ्यांनी दादा, आम्ही पुढील 15 दिवसात काम करून घेतो, असे सांगितले. यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना या सर्व त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही दिल्या. 


दरम्यान, पुणे पोलीस मुख्यालयात अजित पवार यांच्या हस्ते विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

Related Stories

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह

triratna

स्व.उत्तमराव भिंताडे फाऊंडेशनतर्फे ३ हजार गरजूंना भोजनाचे डबे

pradnya p

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, मुंबईत शंभरी पार, नवे दर काय?

pradnya p

चीन पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेणार

datta jadhav

ट्रूनॅट मशीनव्दारे होणार कोरोना विषाणूची चाचणी ; महापालिकेच्या चाचणी केंद्रास मंजुरी

triratna

जपान : फुकुशिमाचे किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्यास मंजुरी

datta jadhav
error: Content is protected !!