तरुण भारत

पोलिसांसाठी २ लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष धोरण ठरणार

प्रतिनिधी/मुंबई

Advertisements

पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून निवफत्तीनंतर त्यांची घरासाठीची वणवण थांबावी, यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत असून गफह आणि गफहनिर्माण या विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडले जाईल, असे  शिंदे यांनी सांगितले.

या संदर्भात गुरुवारी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलिसांसाठी विशेष गफहनिर्माण धोरण तयार करण्याला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली.

सद्यस्थितीत राज्यातील दीड लाख पोलिस हक्काच्या घरापासून वंचित आहेत. त्याना घरं मिळवून द्यायची असल्यास तेवढÎा मोठÎा संख्येने घरांची निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठीच शॉर्ट टर्म, मिडीयम टर्म आणि लॉंग टर्म अशा तीन टप्प्यात या धोरणाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्यासोबतच पोलिसांना सेवा बजावताना लागणारी सेवा निवासस्थाने आणि निवफत्तीनंतर लागणारी मालकी हक्काची निवासस्थाने अशी दुहेरी गरज लक्षात घेऊनच या योजनेचे अंतिम स्वरूप तयार करण्यात येणार आहे.

पोलिसांसाठी घरे निर्माण करण्याचे अनेक पर्याय या बैठकीत समोर आले असून गफह विभाग व गफहनिर्माण विभागाच्या समन्वयाने या धोरणाला अंतिम रूप दिले जाईल. सरकारला  मिळत असलेला हाऊसिंग स्टॉक आणि इतर योजनांमधून उपलब्ध होणारी घरे वगळता अजून घरे पोलिसांना कशी उपलब्ध करून देता येतील, याला सरकारचे प्राधान्य असल्याचे  शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

बार्शीतील जवाहर हॉस्पिटल ला ऑक्सिबेडची व्यवस्था करा – अक्कलकोटे

Shankar_P

ताथवडा घाटात जबरी चोरी

Patil_p

गुंड मिंच्या गवळी खूनप्रकरणी एकास चार वर्ष सश्रम कारवास

Shankar_P

राज्यात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढणार

triratna

सचिन फोलाने यांची भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड

pradnya p

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांचे पक्षाला आदेश; राष्ट्रवादीकडून सीएम फंडासाठी दोन कोटींची मदत

triratna
error: Content is protected !!