तरुण भारत

मुंबईत सकाळपासून पावसाला सुरुवात

ऑनलाईन टीम / मुंबई : 


मुंबईत काल दिवसभराच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा मुंबई पूर्व उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सायन ,चेंबूर, मानखुर्द, घाटकोपरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सकाळी 6 वाजल्यारासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे आजही पाणी भरण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनी पाऊस पाहूनच बाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Advertisements


मुंबईसह उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन किंग्स सर्कल या भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे तिथे दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.

  • लोकल सेवा सुरळीत सुरू

मुंबईसह उपगनगरात पावसाने हजेरी लावली आहे. दिलासादायक बाब म्हणजे लोकल सेवा सुरळीत आहे. हार्बर, टान्सहार्बर आणि पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक सुरु आहे.

  • पुढील 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने मुंबई आणि लगतची उपनगरे ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईतील अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे.

Related Stories

तालुका पुरवठा निरीक्षक रेशन दुकानदाराच्या दारात

Patil_p

खुशखबर! ‘सीरम’ने केली आणखी एका लसीची घोषणा

datta jadhav

20 लाखांचे बनावट हॅण्ड सॅनिटायझर जप्त

pradnya p

जगभरातील कोरोना बळींची संख्या 30 हजारांवर

prashant_c

कोरोनामुळे वाढले सलून व्यवसायिकांचे दर

Patil_p

कोरोनाची दुसरी लाट : उच्चांकी रुग्ण वाढीमुळे केंद्राने घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p
error: Content is protected !!